Corporators Disqualification Case : मनपात आज ९ नगरसेवकांच्या अपात्रतेवर सुनावणी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Corporators Disqualification Case : मनपात आज ९ नगरसेवकांच्या अपात्रतेवर सुनावणी

तीन अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाच्या तक्रारी : पंचवीस नगरसेवकांविरोधात ३७ अर्ज

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तीन अपत्ये, अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केल्याच्या आरोपांवरून नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल तक्रारींवर सोमवारी (दि. ७) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या सुनावणीसाठी आणखी नऊ नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १८ नगरसेवकांविरोधातील तक्रारींवर दोन टप्प्यांत सुनावणी झाली असून, आज तिसऱ्या टप्प्यातील प्रकरणे घेतली जाणार आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी मोठ्या संख्येने तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांसह विरोधी एमआयएमच्या नगरसेवकांचाही २५ समावेश आहे. एकूण नगरसेवकांविरोधात तब्बल ३७ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एमआयएमच्या १८ नगरसेवकांविरोधात ३० तक्रारी आहेत. भाजपच्या सहा नगरसेवकांविरोधात सहा, शिवसेनेच्या एका नगरसेवकाविरोधात तर एक तक्रार दाखल आहे.

तसेच यापूर्वी १७ ऑगस्टला नऊ नगरसेवकांच्या, तर २४ ऑगस्टला आणखी नऊ नगरसेवकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली. या दोन्ही सुनावण्यांवेळी तक्रारदारांनी सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रे तपासण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी वेळ मागितला. त्यानुसार आयुक्तांनी त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.

त्यावरून आज होणाऱ्या सुनावणीतही संबंधित नगरसेवकांकडून तक्रारी आणि पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी मुदत मागितली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी सुनावण झालेल्या प्रकरणांमध्ये नगरसेवकांच म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुढील तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

पहिली फेरी संपल्यानंतर पुढील सुनावणी

२५ नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एकूण ३७तक्रारींच्या सुनावणीची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुढील तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. उर्वरित नगरसेवकांविरोधातील तक्रारींवर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT