छत्रपती संभाजीनगरात 90 टक्के कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार! pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar industry crisis : छत्रपती संभाजीनगरात 90 टक्के कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार!

गॅस टंचाईमुळे 2 लाख कामगारांच्या रोजगारावर मोठे संकट

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आखाती देशांत भडकलेल्या युद्धाचा महाभडका आता थेट छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगनगरीपर्यंत पोहोचला असून, गॅस टंचाईमुळे तब्बल 90 टक्के कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. वाळूज, शेंद्रा आणि बिडकीनसह परिसरातील सुमारे 4500 उद्योगांचे अक्षरशः श्वास कोंडले गेले असून, यामुळे तब्बल 2 लाख कामगारांच्या रोजगारावर मोठे संकट ओढावले आहे. या भयावह परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सीएमआयए आणि मसिआ या आघाडीच्या उद्योग संघटनांनी मंगळवारी (दि.10) तातडीची बैठक घेत तीव चिंता व्यक्त केली.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाल्याने मराठवाड्यातील उद्योगांवर होणारा परिणाम, या विषयावर मचेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग््रािकल्चरफ (सीएमआयए) तर्फे मंगळवारी सीएमआयए सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. दुसरीकडे वाळूज येथे ममसिआफचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची तातडीची बैठक पार पडली.

गॅस पुरवठा अचानक थांबल्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर होणारे गंभीर परिणाम आणि आगामी काळातील आव्हानांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सीएमआयएच्या बैठकीत अध्यक्ष उत्सव माच्छर, उपाध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव मिहिर सोंदलगेकर यांच्यासह सुमारे 25 उद्योग प्रतिनिधींनी सहभाग घेतला, तर मसिआच्या बैठकीत अध्यक्ष गायकवाड, उपाध्यक्ष मनीष अग््रावाल, राहुल मोगले आणि सचिव सचिन गायके यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

उद्योजकांसमोरील संकटे आणि व्यथा :अनेक युनिट्‌‍स बंद पडण्याच्या मार्गावर : उद्योगांमध्ये पावडर कोटिंग करणाऱ्या युनिट्‌‍समध्ये एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्या गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील काही पावडर कोटिंग युनिट्‌‍स बंद पडली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अशा प्रकारची सर्व युनिट्‌‍स कायमची बंद पडण्याची भीती आहे.

दोन लाख रोजगारांवर कुऱ्हाड : जिल्ह्यात सुमारे 4500 लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत असून, यावर सुमारे 2 लाख लोकसंख्येचा रोजगार अवलंबून आहे. 90 टक्के उद्योग संकटात सापडल्याने येथील हजारो कंत्राटी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

रोज 300 मेट्रिक टन गॅसची गरज : सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माच्छर यांनी सांगितले की, ऑटोमोबाईल, स्टील, अभियांत्रिकी, फार्मा आणि फूड प्रोसेसिंगसारख्या उद्योगांना दररोज 200 ते 300 मेट्रिक टन गॅस लागतो. मात्र, सध्या उद्योगांकडे केवळ एक-दोन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.

साठा संपत आला : बैठकीत माहिती देण्यात आली की, संकज ऑटो या कंपनीला दररोज सुमारे 2.6 मेट्रिक टन गॅसची गरज असून सध्याचा साठा फक्त 12 मार्चपर्यंत पुरेल. तर वाळूजमधील एका ऑटोमोबाईल पुरवठादार कंपनीकडे केवळ उद्यापर्यंत पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे.

उद्योगांना 80 टक्के पुरवठ्याची तरतूद

दरम्यान, केंद्र सरकारने काल, 9 मार्च 2026 रोजी नैसर्गिक वायू पुरवठ्याचे नियमन संदर्भात काढलेल्या आदेशानुसार, विविध क्षेत्रांसाठी प्राधान्यक्रम ठरवून गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. यात उद्योग क्षेत्रासाठी मागील सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या 80 टक्के पुरवठ्याची तरतूद करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करताना मसीएमआयएफने या आदेशाची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT