Vaijapur News : पालकमंत्री शिरसाट, आमदार बोरनारे यांच्याकडून जांबरगावात पाहणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur News : पालकमंत्री शिरसाट, आमदार बोरनारे यांच्याकडून जांबरगावात पाहणी

सुरुवातीच्या पावसाने झालेल्या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार संकट उभे राहिले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Guardian Minister Shirsat and MLA Bornare conduct an inspection in Jambargaon

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा सुरुवातीच्या पावसाने झालेल्या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी सोयाबीन, मका, कापूस यासह खरीप पिकांची वाढ खुंटली असून, अनेक भागांतील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार रमेश बोरनारे यांनी रविवारी (दि. २०) जांबरगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली. पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, मका आणि कापूस पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT