Devendra Fadnavis : मराठवाड्यातील दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी  file photo
छत्रपती संभाजीनगर

Devendra Fadnavis : मराठवाड्यातील दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही : ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे, एनडीआरएफपूर्वी राज्याची मदत

पुढारी वृत्तसेवा

Government stands by farmers in drought in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही गुरुवारी (दि. १७) सिद्धार्थ उद्यानात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ५ ऑक्टोबरनंतर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिली जाईल. एनडीआरएफची मदत मिळण्यापूर्वीच राज्य सरकारकडून मदत पोहोचविण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मदत यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, सुहास सिरसाठ, महापौर समीर राजूरकर, जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, मनपा सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता समीर साजेद बिल्डर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जि.प. सीईओ मिन्नू पीएम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाडा हैदराबादेतून मुक्त झाल्यानंतर सातत्याने विकासासाठी संघर्ष करीत आहे. दुष्काळाचे संकटही मराठवाड्यावरच अधिक आहे. यंदाही दुष्काळाचे वर्ष असल्याचे सांगत ते म्हणाले मान्सूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांच्या स्थितीबाबत चिंता वाढली आहे. नियमानुसार ५ ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात. परंतु, सरकारने आतापासूनच त्याची तयारी सुरु केली असून आऑक्टोबर येताच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत देणार आहे. एनडीआरएफची मदत मिळेच. परंतु, त्यापूर्वी राज्य सरकार मदत पूरवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवी यांनी दिली.

पाण्यासह चाऱ्याचे नियोजन

मराठवाड्यात पिण्याच्या पाणीची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. त्यासोबतच चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चारा लागवडीवरही भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमुक्तीसह वीज बिलही रद्द

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना सुरू आहे. यातून १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. आणखी याद्यानुसार प्रक्रिया सुरूच आहे. मोफत वीज आणि जुन्या ४८ हजार कोटी रुपयांच्या वीजबिलांची रद्दबातल करण्याचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे

कर्जमुक्तीसह वीज बिलही रद्द

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना सुरू आहे. यातून १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. आणखी याद्यानुसार प्रक्रिया सुरूच आहे. मोफत वीज आणि जुन्या ४८ हजार कोटी रुपयांच्या वीजबिलांची रद्दबातल करण्याचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच शहरातील प्रत्येक घराघरात दररोज पाणी मिळेल. यासोबतच ३५०० कोटींचा शेंद्रा-बिडकीन, ढोरेगाव सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग, शेंद्रा ते वाळूज हा राज्यातील सर्वात मोठा एलिवेटेड रोड, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्लस्टर, जालना ड्रायपोर्ट आणि घाटीतील ७१० कोर्टीच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांमुळे मराठवाड्याची समृद्धीकडे वाटचाल सुरू असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

३० टीएमसीला वेग

मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा-भीमा खोऱ्यातील ३० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पाला जागतिक बँकेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे धाराशिव, बीड, लातूरपर्यंत पाणी येईल. तसेच कोकणातील उल्हास खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात ७० टीएमसी पाणी आणण्याचा प्रकल्प पुढील सात वर्षांत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.

एमआयएमचे जलील भगव्या वेशात

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे आमदार आणि खासदार असतांना एकदाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर झाले नाही. पंरतु, यंदा पहिल्यांदाच ते सिद्धार्थ उद्यानातील ध्वजारोहण कार्यक्रमास केवळ हजर झालेच नाही. तर चक्क भगव्या झग्यामध्ये त्यांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधले.

शेतीच्या पंचनाम्यांसाठी पंचांग पाहून मुहूर्त कशाला? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याऐवजी पंचनाम्यांसाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त कशाला काढता? शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करायला पंचांग पाहावे लागते का?" असा घणाघाती सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. नवरात्रोत्सवात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी दुष्काळी भागांचा दौरा करणार असल्याचे सांगत, ठाकरे यांनी कर्जमाफी आणि शासकीय मदतीवरून महायुती सरकारवर जोरदार तोफ डागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT