अद्रक व्यापाऱ्यांमुळे मजुरांना आले सुगीचे दिवस file photo
छत्रपती संभाजीनगर

Ginger News : अद्रक व्यापाऱ्यांमुळे मजुरांना आले सुगीचे दिवस

घाटनांद्रा परिसरातील चित्र, आल्यापासून सुंठ तयार करणाऱ्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा

पुढारी वृत्तसेवा

Ginger Traders Bring Prosperous Days to Laborers

गणेश शिंदे :

घाटनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसर सध्या आले (अद्रक) प्रक्रिया व सुंठ साठी कच्चामाल उत्पादनासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर आलेपासून सुंठ तयार करण्यासाठी कच्चामाल तयार करणारा व्यापारीवर्ग निर्माण झाला असून, याचा थेट फायदा मजुरांना होत आहे. परिणामी, परिसरात मजुरांसाठी अक्षरशः सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या आले पिकानंतर शेतात उरलेले अद्रकाचे तुकडे गोळा करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. महिला व पुरुष मजूर शेतांच्या बांधावर जाऊन हे तुकडे वेचून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी आणत आहेत. यात ओल्या अद्रकाला व्यापाऱ्याकडे २५ ते ३० रुपये, तर वाळलेल्या अगकाला सुंठसाठी सध्या बाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे मजुरांना चांगला मोबदला मिळत आहे.

विशेष म्हणजे, एक महिला मजूर दिवसाला सुमारे १००० रुपयांपर्यंतचे अद्रक वेचून आणत असल्याने पारंपरिक शेतीमजुरीपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे मजुरांनी शेतातील नियमित कामांकडे पाठ फिरवली असून, आले वेचण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.

दररोज ४०० ते ५०० रुपये मजुरी देण्याची तयारी असूनही शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत. सध्या परिसरात पूर्व हंगामी मिरची लागवडीचा हंगाम सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत आहे. मात्र मजूर उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे मजुरांचे उत्पन्न वाढत असताना, दुसरीकडे शेतीची कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मजूर-शेतकरी समतोल बिघडल्याचे चित्र घाटनांद्रा परिसरात स्पष्टपणे दिसून येत आहे.

अद्रक शेतकऱ्याकडून विकत घेऊन ती चांगल्या प्रकारे वाळवली जाते व वाळलेला हा सुंठीसाठी तयार झालेला कच्चामाल आम्ही वेगवेगळ्या राज्यात पाठवतो. तिथून पुढे या वाळलेल्या अद्रकीत प्रक्रिया करून सुंठ तयार करून परदेशात पाठवला जातो. मागील वर्षी आम्हाला यापासून जास्त फायदा झाला होता मात्र यावर्षी युद्धामुळे भाव ढासळले आहे त्यामुळे आम्हाला व्यवसायात तोटा सहन करावा लागत आहे.
- इम्रान पठाण, अद्रक व्यापारी.
ओले अद्रक व वाळलेले अद्रक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वेचून आणून देत आहे. आम्ही वाळलेल्या अद्रकाला शंभर ते १२० रुपये भाव देत आहे ओल्या अद्रकाला ३० रुपये दर आमच्याकडून दिला जात आहेत.
- साजिद पठाण, अद्रक व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT