Geet Bhimayan's dream of a voice remained unfulfilled.
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण असलेला गीत भीमायन या प्रकल्पातील निवडक गाण्यांना स्वरसम्राज्ञी आशा भोसले एक गाणे गाणार होत्या. त्यांच्या तारखांची प्रतीक्षा सुरू असतानाच नुकताच त्यांचा आवाज हरपला. आशा भोसले यांच्या जाण्याने गीत भीमायानला मिळणाऱ्या आवाजाचे स्वप्न अधुरेच राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठाने गीत भीमायन या प्रकल्पात बाबासाहेबांच्या जीवनावरील निवडक १०० गाण्यांचे रेकॉर्डिंग देशातील प्रसिद्ध गायकांकडून गाण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पावर काम करणारे प्रा. डॉ. संजय मोहोड व अनेक भीम अनुयांयांची गान कोकीळा लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांचे गाणे गावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रयत्नही झाले.
या दरम्यानच्या काळात लता मंगेशकर यांची तब्येत खराब असल्याने या गाण्यांसाठी आशा भोसले यांच्याकडे विनंती केली. विनंतीला मान देत हे गाणे गाण्यासाठी भोसले यांनी तयारी दर्शवली होती. त्या अनुषंगाने सर्व तयारीही करण्यात आली होती.
साऊंड ट्रॅक तयार दरम्यान हळू या ग लाटांनो... या गाण्यांचा साऊंड ट्रॅकही तयार करण्यात आला. यात तबला, सतार व इतर वाद्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. केवळ आशा भोसले यांचा आवाजाचे डबिंग बाकी होते. त्यांच्या कार्यक्रमांच्या तारखांमुळे हे काम लांबवणीवर पडले होते. लवकरच त्या है गाणे गाणार, अशी आशा असतानाच त्यांच्या निधनाची बातमी येऊन धडकल्याने गीत भीमायानला मिळणाऱ्या आवाजाचे स्वप्न अपूर्णच राहिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
गाण्यासाठी दिला होता होकार
या प्रकल्पात आशा भोसले यांनी आवाज मिळालाच पाहिजे यासाठी प्रा. संजय मोहोड व गीत भीमायानचे काम करणाऱ्या स्टूडीओचे ओनर नरेंद्र भीडे यांनी अनेकदा संपर्क साधून आशा भोसले यांचा होकार मिळवला होता. यामुळे पूर्ण टीमला मोठा आनंद झाला होता. दरम्यान त्यांच्या जाण्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.
आवाजाचा चौकोणी चिरा निखळला
चौकोनी चिरा जसा कोणत्याही स्थितीत परफेक्ट बसतो. तसेच आशा भोसले यांचा आवाज हा कोणत्याही ट्रॅकमध्ये बसत होता. त्यांच्या जाण्याने आवाजाचा चौकोनी चिरा निखळला अशा शब्दात प्रा. संजय मोहोड यांनी श्रद्धांजही वाहिली.