Sambhajinagar News : महाकालकडून मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचा देखावा  File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महाकालकडून मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचा देखावा

३८ फूट उंच कळस, ३० बाय ३० चा भव्य गाभारा गणेशभक्तांचे आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

Ganpati Festival Mahakal created the appearance of the Meenakshi Temple in Madurai

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नागेश्वरवाडी येथील महाकाल गणेश मंडळाकडून यंदा मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. तब्बल ३८ फूट उंच डोमवरील कळस आणि ३० बाय ३० च्या भव्य गाभाऱ्यात सुंदर आणि कोरीव नक्षीकाम केलेले खांब आणि संपूर्ण मंदिर गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची पहिल्या दिवसापासून गर्दी होत आहे.

मंडळाचे अध्यक्ष सौरभ यादव म्हणाले, दरवर्षी गणेशभक्तांसाठी भव्यदिव्य आणि विशाल देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. ही परंपरा आम्ही यंदाही जोपासली आहे. यावेळी तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील मीनाक्षी मंदिराची प्रतीकृती उभारण्याचा प्रयत्न मंडळाच्या सदस्यांनी केला आहे.

हुबेहूब मंदिराचा देखावा तयार करण्यासाठी खास हैदराबाद येथील कारागिर आणि फायबरचे साहित्य मागवण्यात आले. या कारागिरांनी अथक परीश्रमातून १५ दिवसांत मीनाक्षी मंदिराची प्रतीकृती उभारली. सुमारे ३८ फुट उंच मंदिराचा कळस आहे. तर ३० बाय ३०च्या आकाराचा मोठा गाभारा अनेक सुंदर नक्षीकाम केलेले खांबाच्या सहाय्याने उभा केला आहे. या मंदिराच्या आता गणेश मंडळाची भव्य फुट उंच गणेशमर्ती विराजमान केली आहे.

खुल्या जागेवरच देखाव्याची उभारणी

महाकाल मंडळाकडून उभारले जाणारे विशाल देखावे लक्षवेधी असतात. नागेश्वरवाडीकडून खडकेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेवर मीनाक्षी टेम्पलचा भव्य देखावा उभा करण्यात आला आहे. हा देखावा गणेशभक्त आणि बच्चेकंपनीसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT