वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur ST bus theft : वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : शहरातील एसटी बसमधील प्रवासादरम्यान एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 9 ग््रॉम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. 6) दुपारी घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई दादासाहेब शेळके (वय 62, रा. बाभुळगाव, ता. पैठण) या पतीसह गंगापूर येथे उपचारासाठी आल्या होत्या. शहरातील धनवंतरी ॲक्यूपंक्चर सेंटर येथे अर्धांगवायूवर उपचार घेतल्यानंतर त्या दुपारी सुमारे 2.30 ते 3.00 वाजण्याच्या सुमारास गंगापूर बसस्थानकातून एसटी बसने भेंडाळा फाट्याकडे निघाल्या होत्या.

दरम्यान बसमधील प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र (4 ग््रॉम) तसेच सोन्याचा पत्ता व मणी असलेली पोत (5 ग््रॉम) असे एकूण 9 ग््रॉम वजनाचे दागिने लंपास केले. या दागिन्यांची अंदाजे किंमत सुमारे 63 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झांझुर्णे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT