Four die in drowning
गंगापूर : घरासमोर खेळत असताना कुटुंबीयांची नजर चुकवून बाहेर गेलेल्या दोन चिमुरड्यांचा गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ९) दुपारी गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे घडली.
आयुश रवींद्र मिसाळ (३) आणि तनवी अविनाश मिसाळ (२) अशी बालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर वस्ती येथील दिलीप मिसाळ यांचा नातू आयुश आणि नात तनवी हे दोघे रविवारी दुपारी घरासमोर खेळत होते. खेळता खेळता कुटुंबीयांची नजर चुकवून दोन्ही चिमुरडे घरापासून काही अंतरावर गेले. काही वेळाने मुले दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू असतानाच तासाभरानंतर मुले गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमधील पाण्यात आढळून आली. त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून चिमुरड्यांना मृत घोषित केले.
आयुश हा रवींद्र मिसाळ यांचा एकुलता एक मुलगा, तर तनवी ही अविनाश मिसाळ यांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुरड्यांच्या अकाली मृत्यूने नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
सायंकाळी पाच वाजता अमळनेर वस्ती येथे शोकाकुल वातावरणात दोन्ही चिमुरड्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मिसाळ कुटुंबीयांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन केले. अवघ्या दोन-तीन वर्षांच्या चिमुरड्यांचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गंगापूर : घरासमोर खेळत असताना कुटुंबीयांची नजर
चुकवून बाहेर गेलेल्या दोन चिमुरड्यांचा गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ९) दुपारी गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे घडली.