Sambhajinagar Crime : गांजा विक्रेत्यांच्या टोळीचा पर्दाफाश, गांजासह चाकू, रोख जप्त  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : गांजा विक्रेत्यांच्या टोळीचा पर्दाफाश, गांजासह चाकू, रोख जप्त

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाची मुकुंदवाडीत कारवाई; ९०० ग्रॅम

पुढारी वृत्तसेवा

Gang of marijuana sellers busted, marijuana along with knives and cash seized

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी भागात सर्रासपणे गांजा विक्री करणाऱ्या पंटरला पकडताच पुरवठादाराच्याही घरात छापा मारून पोलिस आयुक्तांच्या व विशेष पथकाने सुमारे ९०० ग्रॅम गांजा, चाकू, मोपेड आणि रोख ३८ हजार रुपये जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. २४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशनजवळ पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.

पंकज बाळू चव्हाण (२०), बाळू आसाराम चव्हाण (४२, दोघेही रा. राजनगर, मुकुंदवाडी) आणि त्यांना गांजा पुरवठा करणारा रोहित शाम सोळुंके अशी आरोपींची नावे आहेत. यातील बाळू आणि पंकज यांना पोलिसांनी अटक केली. अधिक माहितीनुसार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अवैध धंदे, नशेखोरांवर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाचे सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनलगत एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तात्कळ पोलिस आयुक्तांना माहिती दिली.

त्यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक अर्जुन कदम, संदीप काळे, अभिजित चिखलीकर यांच्यासह पथकातील १३ अंमलदार व ५ महिला अंमलदार असे पथक घेऊन कारवाईसाठी गेले. तिथे आरोपी पंकज चव्हाण मोपेडवर बसलेला होता. त्याच्या गाडीची झडती घेतली तेव्हा धारदार चाकू, ९५ ग्रॅम गांजाच्या पुड्या आढळून आल्या. त्याच्या घर घरझडतीत ८० ग्रॅम गांजा, चिलीम आणि रोख २९ हजार ३० रुपये मिळून आले. त्याच्या चौकशीत पुरवठादार राजनगर येथील रोहित साळुंकेचे नाव समोर आले. त्याच्या घरात झडती घेतल्यानंतर पथकाला सुमारे ९०० ग्राम गांजा सापडला. तसेच रोख ७हजार ८०० रुपये गांजा विक्रीतून जमवलेले जप्त करण्यात आले. मात्र, रोहित घरात मिळून आला नाही. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची बेड्या लावून काढली धिंड

तरुणांना नशेच्या आहारी घालणाऱ्या तस्करांची, गुन्हेगारांची धिंड काढण्याचा पोलिसांचा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी पोलिसांनी चरसची मोठी कारवाई करून आरोपी पकडले. मात्र, त्या आरोपींची धिंड काढताना माध्यमांना दूर ठेवल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुनावले होते. दुसऱ्या दिवशी एनडीपीएसच्या पथकाला त्या आरोपींची यथेच्छ प्रसाद देऊन धिंड काढावी लागली होती. पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने गांजासह पकडून दिलेलया आरोपींची शुक्रवारी (दि. २६) नारेगाव, राजनगर आदी भागात बेड्या घालून धींड काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT