Sambhajinagar Crime : मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ : शिक्षिकेसह वृद्धेचे गंठण हिसकावले  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mangalsutra Stolen : मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ : शिक्षिकेसह वृद्धेचे गंठण हिसकावले

पुंडलिकनगर व एन-१ सिडको भागातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Gang of mangalsutra thieves: Mangalsutra snatched from teacher and elderly woman

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच असून, अद्याप चोरांना पकडण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शिक्षिकेसह वृद्धेचे मिळून साडेचार तोळ्यांचे गंठण दुचाकीस्वार चोरांनी हिसकावून नेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी राखी तुकाराम नरळदकर (५०, रा. उत्तरानगरी) या बुधवारी (दि.८) सकाळी साडेनऊच्या सुमारास युनिक नर्सरी स्कूल, एन-४ भागात शाळेच्या गेटसमोर उभ्या होत्या. काळ्या रंगाच्या दुचाकीवर अचानक दोन जण त्यांच्याजवळ आले. काळे येथे राहतात का, अशी विचारणा केली.

राखी यांनी मला माहिती नाही, असे म्हटले. तेव्हा दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने राखी यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावून दोघांनी धूम ठोकली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक सुनील म्हस्के करत आहेत.

माघारी फिरून वृद्धेचे दोन तोळ्यांचे गंठण ओढले फिर्यादी सुरेखा विठ्ठल कुलकर्णी (६०, रा. विजयश्री कॉलनी, एन-५ सिडको) या नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.७) मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. एन-१, काळा गणपती मंदिर मागील पार्कमध्ये तासभर फिरून त्या साडेनऊच्या सुमारास बाहेर आल्या.

जळगाव रोडला जोडलेल्या सर्व्हिस रस्त्याने रेणुका बंगल्याच्या कोपऱ्यावर झाडाखाली त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले. त्यांच्यासमोरून जाऊन पुन्हा वळून मागे आले. त्यातील एकाने सुरेखा यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण हिसकून धूम ठोकली. सुरेखा यांनी आरडाओरड केल्याने लोक जमा झाले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दोघेही तोंडाला रुमाल बांधून आलेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT