शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी साडेआठ हजार रुपये, सरकारचा जीआर निघाला, रब्बीसाठी वेगळे १० हजार

राज्यातील अतिवृष्टी व पूर आ-पत्ती बाधितांसाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले होते.
Farmer Compensation
शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी साडेआठ हजार रुपये, सरकारचा जीआर निघाला, रब्बीसाठी वेगळे १० हजार File Photo
Published on
Updated on

Farmers to be compensated with Rs 8,500 per hectare for losses

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अतिवृष्टी व पूर आ-पत्ती बाधितांसाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्याचा अध्यादेश गुरुवारी (दि.९) जारी झाला. त्यानुसार, नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. याशिवाय रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये निधी दिला जाणार आहे. दोन्ही रक्कम तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.

Farmer Compensation
MSRTC : प्रवाशांच्या सेवेत लवकरच 'आपली एसटी' ॲप

मराठवाड्यात आणि राज्यातील इतरही अनेक जिल्ह्यांत यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अत-ोनात नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील शेती पिके नष्ट झाली. हजारो जनावरे दगावली. ठिकठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच अतिपावसामुळे अनेकांची शेतजमीन खरवडून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने /.. पान ५ आठवडाभरापूर्वी अतिवृष्टी व पूरबाधितांसाठी ३१ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले.

त्यावेळी नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १८ हजार ५०० रुपये मदत दिली जाईल. रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. गुरुवारी या पॅकेजचा अध्यादेश जारी करण्यात आला. त्यानुसार नुकसानीपोटी शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपयेच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रब्बी पेरणीसाठी खते व बियाणे खरेदीकरिता हेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. दोन्ही मदत ही तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.

Farmer Compensation
Sambhajinagar Crime : कुख्यात गुंड टिप्याच्या टोळीवर दुसऱ्यांदा मोक्का

राज्यातील २५३ तालुके बाधित घोषित

ही मदत बाधित तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत. यात मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे.

ई-केवायसीतून सूट

ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी होऊन अॅग्रीस्टॅकमध्ये ई-केवायसी झाली आहे. अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे.

जीआरनुसार अशी मिळेल मदत

मृत व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपये

चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये

साठ टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये

पूर्णतः घर नष्ट झाल्यास १ लाख २० हजार रुपये

अंशतः घर नष्ट झाल्यास ६५ हजार रुपये

झोपडीचे नुकसान ८ हजार रुपये

गोठा नुकसान ३ हजार रुपये

मृत जनावरांसाठी

दुधाळ जनावरे ३७हजार ५०० रुपये - लहान जनावरे २० हजार रुपये

ओढकाम करणारी जनावरे ३२ हजार रुपये

शेळी-मेंढी ४ हजार रुपये प्रतिजनावर.

कुक्कुटपालन शंभर रुपये प्रतिकोंबडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news