Ganesh Chaturthi 2025 : आस गणरायाच्या आगमनाची..., मूर्तीची बुकिंग सुरू, यंदा ३० टक्के दरवाढ File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ganesh Chaturthi 2025 : आस गणरायाच्या आगमनाची..., मूर्तीची बुकिंग सुरू, यंदा ३० टक्के दरवाढ

पीओपीच्या मूर्तीना शासनाची बंदीचा निर्णय घेते की काय यामुळे कमी प्रमाणात मूर्ती बनविण्यात आल्याने मूर्तीचे भाव वाढले.

पुढारी वृत्तसेवा

Ganesh Chaturthi 2025 Idol bookings begin, prices hiked by 30 percent this year

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू असून श्रींची मूर्ती बुकिंग करण्यासाठी गणेश मंडळे व भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान, बाप्पांचे आकर्षक नानवधी रुप मूर्तिकारांनी साकारले, असून पीओपीच्या मूर्तीना शासनाची बंदीचा निर्णय घेते की काय यामुळे कमी प्रमाणात मूर्ती बनविण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेते दीपक राजपूत यांनी सांगितले.

श्री गणेशोत्सवासाठी अवघे वीस दिवस शिल्लक असल्याने बाप्पाच्या आगमनाचे वेध साऱ्यांनाच लागले असून यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे व मंगलमय वातावरण तयार झाले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, भक्तांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी, तर काहींनी बुकिंगसाठी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हा परिषद मैदानासह शहरातील विविध भागांतील मूर्तिकार, विक्रेत्यांकडे गर्दी केल्याचे चित्र आहे.

एक फुटापासून १४ फूट उंचीच्या मूर्ती शहरात उपलब्ध आहेत. स्थानिक मूर्तिकारांनी साकारलेल्या तसेच पेन, अहिल्यानगर येथून गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. मपीओपीफ्सह शाडू मातीचे गणपती उपलब्ध असून शाडू मातीच्या मूर्तीला मागणी वाढली आहे. अनेक मंडळांनी बुकिंगवर भर दिला आहे.

छावा स्टाईल गणराया...

गणरायाची मूर्ती, यासह सिंहासनावर आरुढ, दगडूशेठ हलवाईचा गणपती, राजगादीवर विराजमान, लालबागचा गणपती, उंदीरावर स्वार गणराय, नागधारी व फेटेवाला बालगणेश अशा विविध रूपांतील गणरायांचे दर्शन मूर्तिकारांनी घडविले आहे. यंदा छावा स्टाईल असलेली छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशातील गणरायाची मूर्ती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT