शाळांपासून चहाच्या टपरीपर्यंत : वन्यजीव संवर्धनाची जनजागृती Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Wildlife Conservation : शाळांपासून चहाच्या टपरीपर्यंत : वन्यजीव संवर्धनाची जनजागृती

कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांचा अभिनव उपक्रम, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

From schools to tea stalls: Raising awareness about wildlife conservation

कन्नड, पुढारी वृत्तसेवा वन्यजीव संवर्धनासाठी लोकजागृतीचा नवा मानदंड प्रस्थापित करत, करड प्रादेशिक बनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांपासून चहाच्या टपरीपर्यंतफाक हा नावीन्यपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत वन्यप्राण्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन रुजविण्याचा संकल्प केला.

या जनजागृती उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक गुरुकृपा वस्ती शाळा, केंद्र चिकलठाण येथे करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधताना टोम्पे यांनी वानर, हरीण, माकड यांसारख्या वन्यप्राण्यांना घरगुती अन्न देण्याचे दुष्परिणाम आणि बिबट्या अधिवासात नागरिकांनी घ्यावयाची काळजी यायावत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्याध्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी शरद वेताळ व संगीता पसारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

शाळेच्या परिसरात जनजागृती माहितीपत्रके लावण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी ती पीडीएफ स्वरूपात पालकांच्या व्हॉट्सअॅप गटांवर शेअर केली, ज्यामुळे संदेश घराघरात पोहोचला, भारंबा तांडा येथील चहाच्या टपरीवर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांशी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांनी मोकळा संवाद साधला. या वेळी बिबट्या अधिवासात सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी, पीक नुकसान भरपाईची प्रक्रिया तसेच वन्यप्राण्यांना अनं न देण्याचे महत्त्व वा विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

परिसरात जनजागृती पत्रके लावून ती व्हॉट्सअॅप गटांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला. कन्नड तालुक्यात वनविभागाने राबविलेल्या या आगळ्या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांविषयी आदर, संवेदनशीलता आणि संरक्षणाची भावना समाजात दृढ होत आहे.

फक्वत शाळेपुरतीच नव्हे, तर डोणगाव, बहिरगाव, भोकणगाव, चिकलठाण, जैतखेडा तांडा, भार्रवा तांडा आणि भारंचा या गावांतील ग्रामपंचायत कार्यालये, शाळा परिसर आणि दर्शनी ठिकाणी जनजामृती पोस्टर्स लावण्यात आले. वनकर्मचारी अशोक आव्हाड आणि भाऊसाहेब चाच यांनी जनतेशी संवाद साधत वन्यप्राणी संरक्षणाचा संदेश दिला.

वन्यजीव हे आपल्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत, त्यांचे रक्षण करणे ही केवळ बनविभागाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संवाद आणि जनजागृतीद्वारेच आपण माणूस आणि निसर्ग यांच्यातील संतुलन राखू शकतो.
शिवाजी टोम्पे परीक्षेत्र अधिकारी, कन्नड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT