Land Scam Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Land Scam: संभाजीनगरमध्ये मोठा घोटाळा उघड, तहसीलदारांची बनावट सही करून तब्बल 150 प्लॉटची विक्री

Chhatrapati Sambhajinagar News: 150 प्लॉट विक्री करून फसवणूक केल्याची सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Land Scam News

छत्रपती संभाजीनगर : अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नावे बनावट सही, शिक्का, लेटर पॅडवर आदेश पारित करून मौजे शेखापूर येथे १ हेक्टर २१ आर शेतजमिनीवर बोगस लेआऊट टाकले. त्यात १५० प्लॉटची विक्री करून शासनासह अनेक लोकांची फसवणूक केल्याची तक्रार सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

फुलंब्री येथे काही दिवसांपूर्वीच बोगस लेआऊट टाकून लोकांना प्लॉट विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. सातारा परिसरातील एका तक्रारदाराने सिटी चौक ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या बनावट सही, शिक्क्याने अकृषिक वापराची परवानगी वापरून १५० भूखंडाची बेकायदेशीर विक्री केल्याचे म्हटले आहे. हा बोगस आदेश ७ नोव्हेंबर २०२३ मध्ये तयार करण्यात आला. त्यात मौजे शेखापूर येथील २४२०० चौरस मित्र जागेवर अकृषिक परवानगी मिळाली असल्याचे नमूद केले.

रेखांकन मंजूर असल्याचे भासवून १५० पेक्षा अधिक लोकांची २५ कोटींहून अधिकची फसवणूक केली. शासनाचे कोट्यवधींचे मुद्रांक बुडविले. या तक्रारीत फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या शहरातील दोन महिलांची नावे नमूद आहेत. याप्रकरणी अर्ज चौकशीनंतर गुन्हा कधी दाखल करण्यात येणार याबाबत माहिती घेण्यासाठी सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

मंडळ अधिकारी, तलाठ्यांचा अहवालच नाही

बनावट आदेशात वाचा म्हणून ज्या संदर्भाचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये देखील संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा अहवाल घेतल्याबाबत काहीही उल्लेख नाही.

संचिका, जावक क्रमांकाचा फोलपणा

बोगस आदेशात जावक क्रमांक ४१५-अ असा उल्लेख आहे. मात्र, तहसील कार्यालयात माहिती अधिकारात मागणी केली तेव्हा तो अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तसेच संचिकादेखील उपलब्ध नाही. तीन जणांनी अर्ज करून याची पडताळणी केली. तसेच काही खरेदीदारांच्या कागदपत्रात देखील लेआऊट क्रमांक नमूद नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT