Fraud Case Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक; तरुणाने घेतला गळफास

प्रोसेसिंग फीच्या नावाखाली | उकळले दोन लाख, एजंट बाप लेकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Fraud Committed Under the Pretext of Arranging a Loan; Young Man Attempts to End His Life

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

धडपडणाऱ्या अमोल विजय शिंदे (२६, रा. बापुनगर, खोकडपुरा) या तरुणाला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी दीड ते दोन लाख रुपये उकळले. मात्र, कर्जही मिळाले नाही, अन् पैसेही परत करत नसल्याने याच जाचाला कंटाळून त्याने गळफास घेऊन जीवन संपवले.

ी घटना २ मे रोजी सकाळी बापूनगर (खोकडपुरा) येथे घडली. या प्रकरणी चिठ्ठी आणि भावाच्या तक्रारीवरून आरोपी बाप-लेकाविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. ९) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय पाखरे आणि त्याचे वडील संजय पाखरे (दोघे रा. भावसिंगपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

मृत अमोलचा मोठा भाऊ विवेक विजय शिंदे (२९) याच्या तक्रारीनुसार, अमोल एका पुस्तकाच्या दुकानात कामाला होता. मात्र, त्याला स्वतःचा धंदा टाकण्यासाठी पाच ते दहा लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. यासाठी त्याला आरोपी एजंट अजय पाखरे आणि त्याचे वडील संजय पाखरे दोघांनी सहा महिन्यांपूर्वी कर्जाची फाईल मंजूर करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये प्रोसेसिंग फीची मागणी केली.

अमोलने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन मोडून आणि लोकांकडून उसने पैसे घेऊन त्यांना ही रक्कम दिली. मात्र, बरेच दिवस उलटूनही संजय आणि अजय पाखरे कर्ज मंजूर करून देत नसल्याचे अमोलच्या लक्षात आले. त्यामुळे दोन-तीन महिन्यांपूर्वी अमोल पैसे परत मागण्यासाठी त्यांच्या भावसिंगपुरा येथील घरी गेला होता. त्यावेळी बाप-लेकांनी त्याला, तुझे पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर, नाहीतर मर जा, असे म्हणत मारहाण केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT