विनापासिंग दुचाकीसह चारचाकी वाहने सुसाट File Photo
छत्रपती संभाजीनगर

without passing vehicles : विनापासिंग दुचाकीसह चारचाकी वाहने सुसाट

आरटीओची कारवाई कागदावरच : ऐनवेळी तपासणीची घाई

पुढारी वृत्तसेवा

RTO's action is on paper only: Urgent inspection at the right time

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाहन पासिंगचे काम वाहन विक्रेत्याकडेच सोपवण्यात आले आहे. वाहन विक्रेते ग्राहकांची मर्जी राखण्यासाठी अनेकदा विनापासिंग वाहन ग्राहकांच्या हवाली करत आहेत. हे नियमबाह्य असतानाही आरटीओच्या पथकांची कारवाई मात्र कागदावरच दिसून येत आहे. काही घटना घडल्यानंतर ऐनवेळी वाहन तपासण्याची घाई पथकांकडून करण्यात येते.

नवीन वाहन घेतल्यानंतर त्याची पासिंग होऊन त्यावर क्रमांक आल्यानंतरच वाहन ग्राहकांच्या हाती द्यावे, असे आदेश आहेत अन्यथा आरटीओ कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात येते. प्रसंगी वितरकांचा परवानाही रद्द करण्याची कारवाई करण्याचा अधिकार आरटीओ कार्यलायाला आहे. असे असतानाही शहरात अनेक वाहने विनापासिंगचे सर्रास धावत आहेत. ग्राहकांची मर्जी सांभाळण्यासाठी हे धोकादायक पाऊल वितरकांकडून उचलले जात आहेत. विनापासिंग वाहनांकडून अपघात झाल्यास किंवा चोरीची घटना घडल्यास वाहनध-ारकांचा पत्ता शोधण्यात अनेक अडचणी येतात. तरीही शहरात अनेक वाहने विनापासिंग धावत आहेत.

कारवाईचा केवळ इशाराच

विनापासिंग वाहन देणाऱ्या वितरकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा अनेकदा दिला आहे. त्याचबरोबर वाहनधारकांवरही कारवाई करण्याचा इशारा अनेकदा दिला आहे. असे असतानाही मात्र शहरात सर्रास अशी वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे आरटीओचा इशारा केवळ कागदारच दिसून येत आहे.

वैजापूर आरटीओ आघाडीवर

काही दिवसांपूर्वीच नवीनच उदयास आलेल्या वैजापूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनापासिंग वाहने देणाऱ्या वितरकांवर कडक कारवाई केली. अशा कारवाया वैजापूर कार्यालय करू शकतो. तर शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय अशा कारवाया का करत नाही, असा प्रश्न अनेक वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT