वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या तब्बल अकरा कोटी रुपयांच्या लायनिंग (काँक्रीट) कामातील निकृष्ट दर्जीचा प्रकार मदैनिक पुढारीफ्ने उघडकीस आणला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मंजूर झालेल्या या प्रकल्पातील गैरप्रकार लाभधारक शेतकऱ्यांचा आवाज बनत पुढारीने सलग दोन दिवसांच्या रियालिटी चेकमधून समोर आणले हे काम बंद करण्यात आले आहे. मात्र या चौकशीचे पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यात आहे.
अखेर ठेकेदाराकडून पुन इफेक्ट अकरा कोटींच्या निधीतून झालेल्या कामाची ही अवस्था असल्याने, दजी, मोजमाप व देखर-`खीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी यापूवीही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र संबंधित विभागाकडून केवळ चौकशीचे आश्वासन देत वेळकाढूपणा करण्यात आला. आता मात्र प्रत्यक्ष पुरावे समोर आल्याने, अधिकारी-कंत्राटदार संगनमताचा संशय अधिक गडद झाला होता. मात्र अखेर ठेकदाराने हे काम बंद केले आहे. मात्र चौकशीचे पुढे काय होणार ? हे प्रश्न अजूनही कायम आहे.
जबाबदारीपासून पळ काढण्याची युक्ती ?
निकृष्ट कामाचा भंडाफोड होताच मतात्काळ काम बंदफकरण्याचा निर्णय घेतला जातो. कागदोपत्री हा निर्णय कठोर वाटतो; मात्र प्रत्यक्षात तो कारवाईऐवजी वेळ काढण्याचा सोपा मार्ग तर नाही ना, असा सवाल निर्माण होतो. चौकशीची घोषणा होते, पण तिची वेळमर्यादा ठरत नाही. दोषी कोण, हे ठरत नाही. हे न समजणारे कोडे आहे.
अधिकाऱ्यांकडून कारवाईला अभय
सुरू असलेल्या कामांबाबत वारंवार तक्रारी होऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मंजूर झालेला निधी निकृष्ट कामात वाहून जात असल्याचे आरोप असूनही चौकशी, निलंबन किंवा दंडात्मक पावले का उचलली जात नाहीत, यात अधिकाऱ्यांचा थेट काही संबंध आहे का? किंवा भागीदारी आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रकाराविषयी कार्यकारी अभियंता संत यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.