Fifteen educated youths were duped of Rs. 59 lakhs with the lure of jobs
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : महसूल, आरोग्य, नगरविकास विभागात नोकरीला लावून देतो, असे म्हणत छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित पंधरा तरुणांना ४९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला. यात आरोपींनी चक्क एकाला नियुक्तीपत्र दिले. मात्र ते बनावट निघाल्याने दोघांचे बिंग फुटले.
भरत दिनानाथ वाहुळ (रा. गौतमनगर, जालना रोड, दूध डेअरीसमोर, छत्रपती संभाजीनगर), अंकुश रामलाल पवार (रा. गेवराई तांडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी साहेबराव विठ्ठल वाघमोडे (४२, रा. शिंदेफळ, ता. सिल्लोड) यांनी फिर्याद दिली. वरील आरोपींनी संगनमत करून माझा विश्वास संपादन केला व आम्ही शासकीय नोकरीला लावून देतो, असे आश्वासन दिले. यामुळे मी व काही नातेवाईक तसेच जवळच्या ओळखीच्या तरुणांचे जवळपास ४९ लाख रुपये दिले. यात काही रक्कम फोन पे, गुगल पे वरही दिलेली आहे. यानंतर मला आरोपींनी ई-मेल तसेच व्हॉट्सअॅपवर बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र पाठवले. मात्र नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यावर सदर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी साहेबराव वाघमोडे यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणी वरील दोघांविर- ोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहू घोडे करीत आहेत.
आरोपींनी आधी फिर्यादीच्या पुतण्याला नोकरीला लावून देतो म्हणत पैसे घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी मेलवर आहिल्यानगर (अहमदनगर) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियुक्तीपत्र टाकले. यामुळे आरोपींवर विश्वास बसला. यानंतर फिर्यादीने नोकरीसाठी आर-ोपींना पंधरा तरुणांचे ४९ लाख रुपये दिले. मात्र नियुक्तीपत्र बनावट निघाले व आपली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.