FDA Raid Sillod ST Stand Canteen PUDHARI
छत्रपती संभाजीनगर

FDA Raid Sillod ST Stand Canteen: सिल्लोड एसटी कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई; परवाना निलंबित, कॅन्टीन बंद

Anirudha Sankpal

fda raid sillod st bus stand canteen: अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत सिल्लोड एसटी बस डेपोतील कॅन्टीनची तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये गंभीर आस्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळून आल्या. फरशीवर धूळ, माती व कचरा साचलेला होता, तर भिंतींचे पापुद्रे निघालेले आणि भिंती काळवंडलेल्या आढळल्या. खिडक्यांना कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळीही नव्हती.

कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला नव्हता. पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. भांडी धुण्याची जागा अस्वच्छ होती. तसेच चिप्स, नमकीनसह काही खाद्यपदार्थांच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे, ॲप्रन व हातमोजेही आढळले नाहीत. हात धुण्याची सुविधा, साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाच्या नोंदींचाही अभाव होता.या गंभीर त्रुटींमुळे प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करून कॅन्टीन बंद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT