Sambhajinagar News : शेतकऱ्यांचे मुलाबाळांसह तहसीलसमोर उपोषण file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शेतकऱ्यांचे मुलाबाळांसह तहसीलसमोर उपोषण

विडोळी शेतात जाण्याकरिता रस्ता खुला करून देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Farmers hold hunger strike along with their children in front of the Tehsil office

मंठा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील विडोळी ते देवठाणा (मंठा) येथील शिव पाणंद रस्स्त्याच्या कामात सतत अडथळा निर्माण करून शेतात जाणाऱ्या रस्त्याचे काम अडविणाऱ्या गैरअर्जदार शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई करून रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी विडोळी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोमवार (दि.१) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

विडोळी खुर्द शिवारामध्ये जवळपास १०० ते १५० शेतकरी आहेत. त्यांना शेतात जाण्याकरिता विडोळी ते देवठाणा (मंठा) येथील शिवपाणंद रस्त्याचे तत्कालीन तहसीलदार मंठा यांनी उद्घाटन करून मागील तीन-चार वर्षांपूर्वी काम सुरू केले होते.

हे काम जवळपास दोन कि.मी. पूर्ण केले, त्यानंतर शेतापर्यंत जाण्यकरिता केवळ २०० ते ३०० मीटर रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते खुले करून द्यावेत याबाबत शासन निर्णय असतानासुद्धा शासनाच्या आदेशाला गैर अर्जदार शेतकरी हे केराची टोपली दाखवीत आहे.

पाहणी करून गैरअर्जदार शेतकऱ्यांनी अडविलेला रस्ता खुला करून देण्यान यावा या मागणीसाठी आमरण उपो षणाला बसले आहेत. उपोषणार्थीमध्य आदिनाथ अशोकराव गोरे, विष्ण सोपानराव गोरे, एकनाथ ज्ञानोब अवचार, अशोक बाबूराव गो यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

रस्ता नसल्याने दहा कि.मी.ची पायपीट

अपूर्ण राहिलेल्या या कामासाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने रस्ता खुला करून देण्याचे आदेश काढलेले असतानासुद्धा हा रस्ता खुला न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दहा किलोमीटर पायपीट करून शेतात जावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दोनशे ते तीनशे मीटर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून त्यामध्ये साप विंचू शेतकऱ्यांना इजा करण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT