Urea Fertilizer ...साहेब, मातीतली पीकं आता मातीत घालायची का? File Photo
छत्रपती संभाजीनगर

Urea Fertilizer ...साहेब, मातीतली पीकं आता मातीत घालायची का?

गंगापूर, वैजापूर तालुक्यांत युरियासाठी शेतकऱ्यांची वणवण; अडवणुकीचा कळस

पुढारी वृत्तसेवा

Farmers demand urea fertilizer in Gangapur and Vaijapur talukas, but shopkeepers are not supplying it.

शुभम चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : साहेब मातीतली पिकं पुन्हा मातीतच घालायची का? असा थेट सवाल सध्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील शेतकरी करत आहेत. कारण जिल्हा प्रशासनाच्या आकडेव-ारीनुसार युरियाचा पुरवठा असूनही प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना दिला जात नाही. याउलट युरिया पाहिजे असेल तर, पोटॅश, झिंग नॅनो युरिया घ्या, असा गळा काढला जातोय. ऐन पिकं वाढीच्या टप्प्यात युरियासाठी ही अडवणुकीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम जोरात सुरू आहे. निसगनि यंदा साथ दिली असली तरी शेतकऱ्यांना खरी परीक्षा द्यावी लागतेय ती युरिया खतासाठी. वैजापूर व गंगापूर तालुक्यांत युरिया खताच्या गोण्या ५० हजारांहून अधिक उपलब्ध आहेत. खतांची उपलब्धता स्पष्ट करणाऱ्या कृषी विभागाच्या ब्लॉगची ही आकडेवारी आहे.

मात्र प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांवर युरिया मिळत नाही. शेतकऱ्यांकडून मतानुसार कृषी सेवा केंद्रांकडून युरिया हवं असेल तर त्यासोबत नॅनो युरिया, झिंग किंव्हा पोटॅश खतही घ्यावं लागेल, असा दबाव टाकला जातो. यामुळे युरियाची खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः अडवणूक आणि आर्थिक फसवणूक होते आहे. सध्या पिकं वाढीच्या अत्यंत नाजूक टप्प्यावर आहेत. या टप्प्यावर युरिया न मिळाल्यास उत्पादनात मोठी घट येणार आहे. आधीच हमीभाव नाही, कर्जाचा बोजा आहे, अशात आता खताची ही कुचंबणा म्हणजे प्रशासन आमच्या मरणाची वाट बघतोय का? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटत आहेत.

कृषी केंद्र चालक आणि प्रशासनाचे लांगेबांधे

युरियाचा कृत्रिम तुटवडा करण्यात येत आहे. कारण प्रशासन आणि कृषी सेवा केंद्र चालकांचे लागेबांधे आहेत. बाकी सर्व खते मुबलक उपलब्ध असताना आवश्यक असलेला युरियाच का? मिळत नाही. आणि मिळालाच तर त्यासोबत वाढीव भावात दुसरे बोगस खते घ्यावेचं लागतात, अन्यथा तोही मिळत नाही. आज पिकांना युरियाची नित्यांत गरज असल्याचे, प्रशासनात जाणून असून शांत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

भाऊसाहेब शेळके, शेतकरी नेते

66 हा गंभीर प्रकार आहे. यामागची सत्यता पडताळून पाहू आणि आवश्यक ते पावले उचलू, कारण, आम्ही प्रशासन म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. विशेषतः शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी अन्यथा त्यांच्यावर कारावाई करण्यात येईल.
प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी

जि. प., छत्रपती संभाजीनगर तालुकानिहाय युरिया उपलब्ध युरियाची आकडेवारी

तालुका : वैजापूर खताचा प्रकार : युरिया उपलब्ध गोण्या : २७,११७कृषी सेवा केंद्रांची संख्या : १२३ तालुका : गंगापूर खताचा प्रकार : युरिया उपलब्ध गोण्या : २२,५४६ कृषी सेवा केंद्रांची संख्या : ११२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT