Sambhajinagar Crime : गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सुभाष महाजन याने शेतात पिकांमध्ये गांजाची झाडे अवैधरीत्या लावली होती.

पुढारी वृत्तसेवा

Farmer sentenced to five years in hard labor for growing marijuana

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अवैधरीत्या गांजाची लागवड करणाऱ्या शेतकाऱ्याला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांची दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. २४) ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले. सुभाष महादू महाजन (४५, रा. सोयगाव) असे आरोपीचे नाव आहे.

सुभाष महाजन याने शेतात पिकांमध्ये गांजाची झाडे अवैधरीत्या लावली होती. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिसांनी कारवाई करून त्याच्या शेतातून सुमारे ६३.१९० किलो वजनी गांजाची ३५ झाडे हस्तगत करण्यात आली होती. प्रकरणात सोयगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक अनमोल केदार यांनी फिर्याद दिली होती.

त्यानुसार, १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर तत्कालीन सहायक निरीक्षक अनमोल केदार यांच्या पथकाने तत्कालीन नायब तहसीलदार, कृषी अधीकारी यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी सुभाष महाजन याच्या शेतातील कपाशी व तुरीच्या पिकामध्ये तसेच विहिरीजवळ लपवून ठेवलेली गांजाची झाडे अशी सुमारे ३ लाख १६ हजार रुपये किमतीची ६३.१९० किलो वजनी गांजाची ३५ झाडे जप्त करण्यात आली होती. प्रकरणात सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी सुभाष महाजन याला दोषी ठरवून ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक गणेश जाधव यांनी काम पाहिले. तर अॅड. बांगर यांना अॅड. अभिमान करपे यांनी सहाय्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT