Sillod News : नापिकी, कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने जीवन संपवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : नापिकी, कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने जीवन संपवले

मराठवाड्यातील दुष्काळामुळे नववी जीवन संपवल्याची घटना

पुढारी वृत्तसेवा

Farmer ends his life due to crop failure and indebtedness

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणातून बुधवारी (दि.३०) शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या आठवड्यातील मराठवाड्यातील ही नववी शेतकरी आत्महत्या आहे.

दीपक माधवराव काकडे (२८, रा. धानोरा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुण शेतकऱ्याचे वडील आजारी आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च व कर्जबाजारी असल्याने ते चिंतेत होते. त्यात यंदा पावसाने दगा दिल्याने उभे पीक वाळून गेले. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झालेली होती. या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

या तरुण शेतकऱ्याला धानोरा शिवारात गट क्र. २२/२ मध्ये पवणे तीन एकर शेती आहे. कुटुंबासह ते शेतात वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दीपक काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब निदर्शनास येताच, शेजारील नागरिकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास बीट जमादार यतीन कुलकर्णी करीत आहे. यंदा दुष्काळी परिस्थीतीमुळे मराठवाड्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT