PM Modi - Aga Khan V meet | प्रिन्स रहीम आगा खान यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

भारताच्या विकासातील एकेडीएनच्या योगदानाचे पंतप्रधानांकडून कौतुक
PM Modi - Aga Khan V meet |  प्रिन्स रहीम आगा खान यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!
PM Modi - Aga Khan V meet | प्रिन्स रहीम आगा खान यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या विविध क्षेत्रांत आगा खान विकास नेटवर्कने (एकेडीएन) दिलेल्या दीर्घकालीन योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कौतुक केले. एकेडीएनचे अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान (पाचवे) यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी शाश्वत शहरी विकास, जलसंवर्धन, आरोग्यसेवा, ग्रामीण स्वच्छता, युवकांचे कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण तसेच सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनातील नेटवर्कच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

भारताच्या ऐतिहासिक स्थळांचे पुनर्स्थापना आणि पुनरुज्जीवन करून सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी एकेडीएन केलेल्या प्रयत्नांचेही मोदी यांनी कौतुक केले. प्रिन्स रहीम आगा खान यांनी भारताच्या सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी एकेडीएनची बांधिलकी पुन्हा व्यक्त केली. भारताच्या परिवर्तनशील विकास उपक्रमांचे कौतुक करताना मानवकल्याणाला पुढे नेण्यासाठी नवोन्मेषाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगा खान विकास नेटवर्कने म्हणजे काय?(AKDN)

आगा खान विकास नेटवर्क (एकेडीएन) हे आगा खान यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या विकास संस्थांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे तसेच लोकांचे जीवनमान उंचावणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्यविकास, जलसंवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत शहरी विकास या क्षेत्रांत एकेडीएन काम करते. भारतातही संस्थेने ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि पुनर्स्थापना यांसह विविध विकास प्रकल्प राबवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news