Extension of ration e-KYC, information from the supply department
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
शिधापत्रिकाधारकांना ई-३१ केवायसी करण्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थीचे धान्य बंद होणार असल्याने तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यात २०६ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. तर ६९ हजार ३७५ शिधापत्रिकाधारक असून, २ लाख ८९ हजार २९८ लाभार्थी आहेत. स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी शासनाने बंधनकारक केली आहे. यासाठी शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही लाभार्थी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
शासनाच्या ऑपवर किंवा स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसी करण्याची सुविधा आहे. ज्या लाभार्थीनी ई-केवायसी केले नाही. त्यांचे धान्य यापुढे बंद करण्यात येणार आहे. तर शासनाच्या धान्य योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये, म्हणून ई-केवायसीची मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
तालुक्यात आतापर्यंत २ लाख ३६ हजार लाभार्थीनी ई केवायसी केली आहे. तर ५२ हजार लाभार्थीनी ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसीसाठी आधारकार्डची गरज असून, आध- ारकार्ड शिधापत्रिकेला लिंक असणे गरजेचे आहे. तालुक्यातील ई-केवायसी न केलेल्या लाभार्थीनी तातडीने वाढवून दिलेल्या मुदतीत ई-केवायसी करून घ्यावे. अन्यथा स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.