Ambadi Medium Project : अंबाडी ओव्हरप्लो तरी कन्नडला मात्र दहा दिवसानंतर पाणीपुरवठा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ambadi Medium Project : अंबाडी ओव्हरप्लो तरी कन्नडला मात्र दहा दिवसानंतर पाणीपुरवठा

धरण उशाला असूनही कोरड घशाला कायम, समस्या सोडविण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

Even though Ambadi overflows, water supply to Kannad provided after ten days

संजय मूचक

कन्नड : शहराला पाणीपुरवठा करणारा कै. आप्पासाहेब नागदकर (अंबाडी) मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. शहराला दररोज लागणारे पाणी साठवण्यासाठी नगर परिषदेकडे पाण्याच्या पुरेशा टाक्याच उपलब्ध नसल्याने शहरातील नळ दहा-दहा दिवस कोरडेच राहतात. धरणात भरपूर पाणी साठा असतानाही नागरिकांना थेंबथेंब पाण्यासाठी धावपळ करावी लागते. धरण भरलेले असतानाही शहरवासीयांना आठवड्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अंबाडी प्रकल्प दरवर्षी किंवा एक-दोन वर्षाआड काठोकाठ भरून वाहतो, पण तरीही कन्नडकरांना पुरेशा पाण्यापासून वंचित राहावं लागत. जुन्या झालेल्या पाईपलाईन, कमी क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आणि दुर्लक्षित नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच प्रतीक्षा करावी लागते.

सध्या जुन्या व नवीन शहरात केवळ सहा पाणीटाक्यांमधूनच पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या व नव्या वसाहती यामुळे या टाक्यांची क्षमता अपुरी पडते आहे. त्यामुळे अनेक भागांत नळाला पाणी येईपर्यंत नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागते. दर-वेळी तहान भागवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना नागरिकांच्या पाण्यासारखा महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्प भरलेला असतानाही दहा दिवसांनंतर पाणी मिळते.

नवीन पाईपलाईन, आवश्यक इलेक्ट्रिक कामे, दो नशे के. व्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर व डी.पी. बसविणे, पंपिंग यंत्रणा खरेदी करणे, जलशुद्धीकरण प्रकल्पातील रेती बदलणे तसेच नवीन पाणीटाक्या उभारणे या उपाययोजना तातडीने राबविल्यास दर एक ते दोन दिवसांनी पाणीप-रवठा शक्य होईल, असे मत शहरातील नागरिकांचे आहे.

जेवढे पाणी शहराला लागते तेवढे पाणी साठवण्यासाठी नगर परिषदेकडे पाण्याच्या टाक्याच नाही. जर पुरेशा टाक्या असेल तर कन्नड शहरात उन्हाळ्यातदेखील दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो एवढा पाणीसाठा अंबाडी धरणात आहे.
साईनाथ आल्हाड संचालक बाजार समिती, कन्नड
कन्नड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाही पाणीटाक्या व पाईपलाईन जुन्याच अवस्थेत आहेत. शहरातील जनतेच्या या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने बघत त्या अनुषंगाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
आकाश बोलधने, संचालक, खरेदी-विक्री संघ.
कन्नड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाही पाणीटाक्या व पाईपलाईन जुन्याच अवस्थेत आहेत. शहरातील जनतेच्या या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने बघत त्या अनुषंगाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
आकाश बोलधने, संचालक, खरेदी-विक्री संघ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT