Employment Workers' Striking Work Stoppage Protest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अखिल भारतीय मनरेगा कर्मचारी महासंघ नवी दिल्ली व ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१) एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.
संघटनेचे महाराष्ट्र समन्वयक शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील अनेक रोजगार सेवक सहभागी झाले होते. रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत ३ ऑक्टोबर २०२४ चा मानधन शासन निर्णय लागू करावा, ८ हजार रूपये मानधन व २ हजार रुपये भत्ता द्यावा, पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा, मानधन थेट खात्यावर जमा करावे, रोजगार सेवकांच्या प्रश्नावर मंत्रालयात बैठक आयोजित करावी आदी मागण्यांसह लक्षवेधी एकदिवसीय संप आंदोलन करण्यात आला.
यावेळी शिवाजी गाडे, ज्ञानेश्वर कणसे, दत्तात्रय सोन-वणे, बाळू श्रीखंडे, विलास थोरात, अमोल सोलाटे, सुनील मलपुरे, कृष्णा राजगुरू, कैलास डांगे, सचिन राठोड, प्रकाश मैंद, संतोष नलावडे, शंकर आधाने, महावीर गोसावी, गणेश खोसरे, मंगेश जाधव, गणेश ठेंगडे, अशोक दिलवाले, विकास झिने, गणेश इंदापुरे, संजय रोडगे, योगेश मडके, रवींद्र म्हेत्रे आदी ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.