Electronic Interlocking Impacts Some Trains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-इगतपुरी विभागात अटगाव येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे काही रेल वेच्या मार्गात बदल तसेच काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्या मार्ग बदलून धावणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्हारशाह एक्सप्रेस ६ जून २०२६ रोजी कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड मार्गे धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लिंगमपल्ली एक्सप्रेस ६ जून रोजी कल्याण-कर्जत-पुणे-दौंड-कुडुवाडी मार्गे धावेल.
या गाड्या अंशतः रद्द
हिंगोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ६ जून रोजी नाशिक रोड येथे अंशतः रद्द करण्यात येईल. नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ५ जून रोजी मनमाड येथे अंशतः रद्द करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हिंगोली एक्सप्रेस ६ जून रोजी नाशिक रोड येथून अंशतः सुरू करण्यात येईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड एक्सप्रेस ६ जून रोजी मनमाड येथून अंशतः सुरू करण्यात येईल.