Electricity Theft : न्यायनगरात कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वीज चोरी file photo
छत्रपती संभाजीनगर

Electricity Theft : न्यायनगरात कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वीज चोरी

परिसरातील नागरिकांचा आरोप : अनेक घरांत अनधिकृत वीज पुरवठा

पुढारी वृत्तसेवा

Electricity theft in Nyayanagar with the connivance of employees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गारखेडा परिसरातील न्यायनगर येथील गल्ली क्रमांक ८ सह परिसरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक घरांमध्ये वीज मीटर नसतानाही वीज पुरवठा सुरू असून, महावितरण कर्मचाऱ्यांच्या संगणमतानेच वीज चोरी सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला.

न्यायनगर परिसरातील काही घरांमध्ये अधिकृत वीज मीटर नसतानाही वीज पुरवठा सुरू आहे. काही ग्राहकांकडे मीटर आहे, परंतु त्याचे बिलच येत नसल्याच्याही तक्रारी येथील नागरिकांनी केल्या. हातावर पोट भरणारे नियमित बिल भरत आहेत. तर काही जण महावितरण कर्मचाऱ्याला हाताशी धरून वीज चोरी करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधला असता असे प्रकार तर होणार नाहीत, तरीही त्या परिसरातील प्रमुखांशी संपर्क साधून पुढील माहिती देतो असे सांगितले. दरम्यान, या परिसरात अचानक तपासणी केल्यास मोठ्या MAY/ प्रमाणावर वीजचोरी उघडकीस येणार आहे. मीटर नसलेले तसेच वीजवाहिनीवरून घेतलेल्या अनधिकृत जोडण्याही समोर येण्याची शक्यता आहे. याची योग्य तपासणी करून कर्मचाऱ्यांच्या सहभागाची चौकशी करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

माहिती घेऊन पुढील कारवाई वीजचोरीविरुद्ध महावितरण कडक कारवाई करत आहे. न्यायनगरात वीज चोरी होत असल्याचा नागरिकांकडून होत असलेल्या आरोपाबाबत माहिती नाही. तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येईल. वीजचोरीचा प्रकार घडत असेल तर पुढील कारवाई करण्यात येईल.
मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT