Crime News : क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड

जाब विचारणाऱ्या वडिलांना चाकूने भोसकण्याची धमकी; औरंगपुऱ्यातील घटना, आरोपीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल-
sambhajinagar crime news
Crime News : क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडFile Photo
Published on
Updated on

Crime News: Minor girl stalked and molested while on her way to class

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : औरंगपुरा भागात टायपिंग क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिची छेडछाड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम आयडी मागत अश्लील इशारे करणाऱ्या या आरोपीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला असता त्याने त्यांना थेट चाकूने मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या काकूने दिलेल्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपी संदेश अनिल म्हस्के (रा. किलेअर्क) विरुद्ध पोक्सो व विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हस्केला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, त्याची न्यायालयाने हर्मूल कारागृहात खानगी केली.

sambhajinagar crime news
ST Bus Locations : घरबसल्या एसटीच्या लोकेशनचा घोळ संपेना

पीडित अल्पवयीन मुलगी औरंगपुरा येथील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये टायपिंग क्लाससाठी जाते. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचा क्लास सुटल्यानंतर ती बाहेर आली. त्यावेळी आरोपी संदेश म्हस्के हा क्लासबाहेर उभा होता व तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याचवेळी मुलीला घेण्यासाठी तिचे वडील तिथे आले. एक तरुण आपल्या मुलीकडे सारखा पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी संदेशला हटकले आणि तू माझ्या मुलीकडे का पाहतोस? असा जाब विचारला. तेव्हा संदेशने मी तुला चाकूने मारून टाकेल अशी धमकी दिली आणि तेथून पळ काढला. या प्रकारानंतर वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या मुलाने खूप दिवसांपासून आपला पाठलाग सुरू केल्याचे तिने सांगितले.

sambhajinagar crime news
PM Awas Yojana : पीएम आवास योजनेत घरकुल मिळाले, गृहकर्जाचा पेच कायम !

घरी आल्यावर मुलीच्या काकूनेही तिला जवळ घेऊन विचारले. तेव्हा तिने सांगितले की, आठवड्याभरापूर्वी सायंकाळी ८ वाजता क्लास सुटल्यावर संदेश तिच्यासमोर आला आणि तू मला खूप आवडते, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, तुझी इन्स्टाग्राम आयडी दे, अशी मागणी केली. त्यावेळी ती घाबरून काहीही न बोलता निघून गेली होती.

महिनाभरापासून पाठलाग, मुलीला दमदाटी

जुलैमध्ये ती पायी घरी जात असताना त्याने तिचा पाठलाग करून मोबाईल नंबर मागितला होता. माझा पाठलाग करू नकोस, मला भीती वाटते, मी माझ्या वडिलांना सांगेन, असे तिने सुनावले असता मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणत त्याने दमदाटी केली होती. तो नेहमी क्लासबाहेर उभा राहून अश्लील इशारे करत असे, मात्र भीतीपोटी तिने हे कोणालाच सांगितले नव्हते. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अशफाक शेख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news