Bulldozer Action : बुलडोजर कारवाईसाठी निवडला पहाटेचा मुहूर्त  file photo
छत्रपती संभाजीनगर

Bulldozer Action : बुलडोजर कारवाईसाठी निवडला पहाटेचा मुहूर्त

पोलिसांचे चोख नियोजन; पहाटे चारपासूनच फौजफाटा होता तैनात

पुढारी वृत्तसेवा

Early morning time chosen for bulldozer operation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय देणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या अनधिकृत मालमत्तांवर बुधवारी (दि. १३) महापालिकेने बुलडोझर चालविला. या घडक कारवाईपूर्वी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस पहाटेपासूनच रस्त्यावर उतरले. प्रभारी पोलिस आयुक्त पंकज अतुलकर यांच्यासह संपूर्ण पोलिस फौजफाटा पहाटे चारपासूनच नारेगाव भागात दाखल झाला होता.

पोलिसांच्या या अलर्ट भूमिकेमुळे कारवाईनंतर कुठेही पडसाद उमटले नाहीत. पंकज अतुलकर यांचे जुन्या शहरावर होते लक्ष नारेगावातील कारवाईचे पडसाद जुन्या शहरात उमटण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभारी पोलिस आयुक्त पंकज अतुलकर यांनी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता सिटी चौक पोलिस ठाण्यात तळ ठोकला.

तेथूनच त्यांनी जुन्या शहरातील हालचालींवर करडी नजर ठेवली. नारेगावात सुरू असलेल्या कारवाईची ते माहिती घेत होते. तसेच संवेदनशील भागांत मंगळवारी (दि. १२) रात्रीच सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. तसेच, सर्व ठाणेदारांना पहाटे चारपासूनच सर्व स्टाफसह स्टैंडबाय राहण्याचे कडक आदेश देण्यात आले होते.

पोलिस आयुक्तांच्या सूचना अन्

मोहीम फत्ते मंगळवारी (दि.१२) कारवाईसाठी मनपाचे बंदोबस्त मागितला. तेव्हा पोलिस आयुक्त प्रवीण पवार सुटीवर होते. प्रभारी आयुक्त पंकज अतुलकर यांनी आयुक्त परतल्यानंतर कारवाई करू असे कळविले होते. मात्र, मनपा प्रशासनाने तत्काळ कारवाईचा आग्रह धरला. त्यामुळे सुटीवर असलेले पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पहाटे चार वाजताच कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार मंगळवारी रात्री १० वाजल्यापासूनच नारेगावात तगडा बंदोबस्त लावण्यात आला. पहाटे चारची वेळ नंतर पाच करण्यात आली, मनपाचे पथक पावणेसहा वाजता दाखल झाले त्यानंतर कारवाई सुरू झाली.

असा होता तगडा बंदोबस्त

वरिष्ठ अधिकारीः प्रभारी पोलिस आयुक्त पंकज अतुलकर, उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, सर्व सहायक पोलिस आयुक्त. अधिकारी व अंमलदारः १० पोलिस निरीक्षक, १५ सहायक/उपनिरीक्षक, ८ महिला अधिकारी, १२० अंमलदार, ६० महिला अंमलदार. दामिनी पथक विशेष पथकेः गुन्हे शाखा, विशेष शाखा, दंगा काबू पथक, आणि ५ स्ट्रायकिंग फोर्स. अतिरिक्त कुमकः राखीव दलाचे १२० जवान आणि वज्र, गरुड वाहन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT