मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

प्रकृती खालावल्याने जरांगे उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Due to his deteriorating health, Jarange has been admitted to the hospital for treatment.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात शनिवारी (दि. २७) दुपारी दाखल करण्यात आले.

ताप, सर्दी, खोकला आणि अशक्तपणाचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे यांनी दिली.

डॉ. चावरे यांनी सांगितले की, जरांगे यांना ताप, सर्दी, खोकला व अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होट आहे.

पुढील दोन ते तीन दिवस त्यांना पूर्ण आरामाची आवश्यकता आहे दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर आवश्यक त्या रक्ततपासण्या करण्यात आल्या. तपासणी अहवालानंतर पुढील उपचार निश्चित करण्यात येणान असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT