

The samadhi sight of the Bhosale families will be renovated soon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले, विठोजीराजे भोसले तसेच बाबाजी राजे भोसले यांचे वेरूळ (ता. खुलताबाद) येथील ऐतिहासिक समाधीस्थळांचा लवकरच जीर्णोद्धार करण्यात येणार असून या ठिकाणी कायमस्वरूपी दोन सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. तसेच समाधी परिसराची संपूर्ण साफसफाई करून अतिक्रमण हटविण्यात येईल व निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी शनिवारी (दि. २७) दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक वारशाच्या जतन, संवर्धन व संरक्षणासाठी शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. समाधीस्थळाची दुरवस्था, अस्वच्छता व अतिक्रमणामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनांची व आंदोलनात्मक पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. आवश्यक निधी जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू करण्यात येणार उपलब्ध करून देत लवकरच असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे शिवप्रेमी व सकल मराठा समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे सुरेश वाकडे, रेखा वहाटुळे, हंसराज पाटील, रवींद्र नीळ, नितीन देशमुख, दिनेश शिंदे, आदित्य कदम, संदीप जाधव, ऋषिकेश मोहिते, चंद्रकांत पाटील, अविनाश पाटील, ओमकार पतंगे, संतोष कदम, फणसे, मनोज जाधव, नामदेव गायके, उमेश वाकडे, रामचंद्र पवार, दे-वशेष पात्रा यांच्यासह उपस्थित होते.