Dry Fruit : थंडीचा कडाका वाढताच थाटली सुकामेव्याची दुकाने File Photo
छत्रपती संभाजीनगर

Dry Fruit : थंडीचा कडाका वाढताच थाटली सुकामेव्याची दुकाने

घरोघरी पौष्टिक लाडू बनविण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

Dry fruit shops started as cold weather intensified

अतुल खंडगावकर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थंडी पळविण्यासाठी सुकामेवा किंवा सुकामेव्याचे लाडू खाणे मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. सुकामेव्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच त्वचा व शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सध्या हिवाळा असल्याने या ऋतुत घरोघरी सुकामेव्याचे लाडू आवर्जून केले जातात.

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका वाढल्याने घरोघरी पौष्टिक लाडू बनविण्याची गृहिणींनी तयारी सुरू आहे. आरोग्यासाठी हिवाळा अधिक पोषक मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळे शरी-राचा पोषणकाळ म्हणून हिवाळ्याकडे बघितले जाते. थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने पो षणासह त्वचेसाठीही मदत होते.

सुकामेवा हा पोषक तत्त्वे वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे, ज्यामुळे अशक्तपणा असलेल्या किंवा अशक्तपणाचा धोका असलेल्या लोकांसाठी ते एक उत्तम नाश्ता बनते. जर तुम्ही लोह पूरक आहार घेत असाल तर तुमच्या सुकामेव्याचे सेवन मर्यादित करा, कारण जास्त लोह हानीकारक असू शकते. थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. डिंकाच्या लाडवामुळे अशक्तपणा दूर होतो तसेच सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. डिंकाचे लाडू बद्धकोष्ठता असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. सुकामेव्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असल्याने हिवाळ्यात या पदार्थांचे सेवन आवर्जून करावे.

हिमोग्लोबिनचा उत्तम स्रोत सुक्या मेव्यात हिमोग्लोबिन

वाढवणाऱ्या लोहाचा चांगला स्रोत आहेत, म्हणूनच ते अशक्तपणाविरुद्धच्या लढ्यात उपयुक्त ठरू शकते. फॉलिक अॅसिडसारखे पोषक घटक असतात, जे नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन सी, जे लोह शोषण्यास मदत करते.

सुकामेवा हाडांना बळकट करण्यासाठी फायदेशीर सुकामेवा हाडांना बळकट करण्यासाठी एक निरोगी आणि स्वादिष्ट स्रोत आहे. त्यात हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. उदाहरणार्थ, सुकामेवा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे.
डॉ. सचिन बत्तिसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT