Sambhajinagar : शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल, महायुती, आघाडीचे चित्र अस्पष्ट

शेवटच्या दिवशी इच्छुकांची गर्दी
Sambhajinagar News
Sambhajinagar : शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखलFile Photo
Published on
Updated on

Sambhajinagar News : Filing nomination papers in a show of strength

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यातील ४८ नगरपालिका आणि ११ नगरपंचायतींच्या अध्यक्ष, सदस्यपदासाठी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. १७) दाखल केले. नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. महायुती आणि आघाडीचे चित्र अद्यापही स्पष्ट न झाल्याने निवडणुकीत चुरस पाहावयास मिळणार असल्याचे दिसते. राजरंग पाहता लढती बहुरंगी होण्याचीच शक्यता अधिक आहे.

Sambhajinagar News
District Bank Robbery Case : जिल्हा बँकेचे २५ लाख लुटणाऱ्या टोळीत ग्रा. पं. सदस्यांची दोन मुले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी संभाजीनगर येथे बोलताना युतीबाबतचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना असल्याचे नमूद केले. आघाडीतही अनेक नेत्यांनी स्वबळाची भाषा केल्यामुळे महायुती, आघाडी एकत्रित येण्याबाबत अद्यापही साशंकता आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसला, तरी या पक्षाने सर्व ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर बिलोलीमध्ये भाजपातर्फे उमेदवारी भरणाऱ्या बहुतांश उमेदवारांनी पक्षांतर्गत वादातून शेवटच्या क्षणी 'राष्ट्रवादी'चे घड्याळ बांधून घेत या पक्षातर्फे अर्ज भरले.

देगलूर नगर परिषदेतही भाजपाला नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही. अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याआधी जिल्ह्यात काही ठिकाणी शेवटच्या क्षणी पक्षांतरे झाली. भाजपाने हिमायतनगरमध्ये काँग्रेसच्या डॉ. राजेंद्र वानखेडे यांना फोडून त्यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले तर लोह्यामध्ये अशोक चव्हाण यांचे समर्थक शरद पवार यांनी स्थानिक वादातून पक्ष सोडला.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मुख्य बसस्थानक : पुन्हा आचारसंहितेच्या फेऱ्यात

त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उभे केले आहे. भाजपाचे बी. आर. कदम यांचे जावई स्वप्नील लुंगारे हे कंधारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. भोकरमध्ये काँग्रेसच्या सुभाष किन्हाळकर यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना (शिंदे गटा) तर्फे नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. कंधारमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मन्नान चौधरी यांनीही शेवटच्या क्षणी पक्षत्याग करून आ. चिखलीकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बिलोलीत भाजपाचे इंद्रजीत तुडमे हे रात्रीतून घडलेल्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले.

मैत्रीपूर्ण लढती शक्य

परभणी : सेलू येथे कोणत्याही राजकीय पक्षाने शक्तीप्रदर्शन न करता शांततेत उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या उमेदवारांनी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आढळकर यांच्या नेतृत्वात अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून आत्माराम साळवे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदाची उमेदवारी न देता माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने यांच्या नेतृत्वात ९ प्रभागांत उमेदवार रिंगणात उतरले असून ते भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देणार आहेत, अशी माहिती अविनाश शेरे यांनी दिली. निवडणूक प्रभारी दिनकर वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेश बोराडे, माजी सभापती रविंद्र डासाळकर, तालुकाध्यक्ष गणेश काटकर व शहराध्यक्ष अशोक शेलार यांच्या उपस्थितीत मिलिंद सावंत यांनी नगराध्यक्षाचा अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना-भाजप युतीने मोठे शक्ती प्रदर्शन करीत डफ ढोलांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केले.

पूर्णत अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्षासाठी २८ तर नगरसेवकासाठी २१४ अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीकडून कमलताई कापसे, शिवसेना (उबाठा) कडून प्रेमला एकलारे, काँग्रेसकडून हसीना बेगम, यशवंत सेना तथा आ. गुट्टे मित्रमंडळाकडून विमलताई कदम, वंचितकडून आम्रपाली जोंधळे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. जिंतुरात भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साबीया बेगम, काँग्रेसतर्फे शेख इस्माईल यांनी नक्षराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. पाथरीत काँग्रेसच्या वतीने जुनैद खान दुर्राणी यांन शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोनपेठ येथे नगराध्यक्षपदासाठी १६ तर नगरसेवक पदासाठी १४३ अर्ज दाखल झाले. राकाँचे चंद्रकांत राठोड विरूध्द शहर परिवर्तन विकास आघाडीचे परमेश्वर कदम यांच्यात सरळ लढत होणार आहे.

शिंदे सेनेचा नेता भाजपमध्ये

हिंगोली : हिंगोलीत रेखा श्रीराम बांगर (शिवसेना शिंदे), नीता बाबाराव बांगर (भारतीय जनता पार्टी), आमीनाबी शेख अजीज प्यारेवाले (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), अर्चना श्रीराम भिसे (ठाकरे गट) हे रिंगणात आहेत. वसमतला दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत दाखल झालेल्या डॉ. मारोती क्यातमवार यांनी सोमवारी अचानक भाजपामध्ये प्रवेश करीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीही दाखल केली. त्यांच्या या हनुमान उड्या नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनल्या आहेत. २० नंतर चित्र स्पष्ट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी महायुती, आघाडीचा निर्णय २० पर्यंत होईल. त्यानंतर निवडणूक रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

बीड येथे एमआयएम रिंगणात बीड येथे भाजपकडून डॉ. ज्योती घुमरे यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रेमलता पारवे, शरद पवार गटाकडून स्मिता विष्णू वाघमारे तर एमआयएमने सुरेखा हर्ष शृंगारे (सुरेखा वाजेद इनामदार), भारतीय काँग्रेस कडून करून मिलिंद मस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

परळी येथे मुंडे बंधू-भगिनींनी महायुतीच्या माध्यमातून नगर परिषद निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे, महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी- शिवसंग्राम आघाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सय्यद मैमूना बेगम सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उवाठा शिवसेना आघाडी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दिपक देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धारूर येथे भाजपने रामचंद्र निर्मल यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाने बाळासाहेब जाधव यांना तर शरद पवार गटाने अर्जुन गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. गेवराईत भाजपने गीता बाळराजे पवार यांना उमेदवारी दिली आहे.

अजित पवार गटाने शीतल महेश दाभाडे तर शरद पवार गटाने बागवान शिरीन जुनेद यांना तिकीट दिले आहे अंबाजोगाईत भाजप पुरस्कृत परिवर्तन जनविकास आघाडीच्या वतीने नंदकिशोर मुंदडा यांनी अर्ज भरला असून अजित पवार गटाच्या वतीने देखील अंबाजोगाई विकास आघाडी तयार करून यात शरद पवार गटाला सामील करून घेत राजकिशोर मोदी यांनी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपचे बंडखोर म्हणून शोभा सुनील लोमटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महायुती, 'मविआ'ला धक्के धाराशिव :

नगराध्यक्षपदासाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार लढत होत असतानाच दोन्ही बाजूंनी अनपेक्षित घटना घडल्याने लढती बहुरंगी होणार आहेत. यामुळे दोन्ही पक्षांना धक्के बसले असले तरी निवडणुकीचे संदर्भही बदलणार आहेत. महाविकास आघाडीकडून संगीता सोमनाथ गुरव, महायुतीकडून नेहा राहुल काकडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंजुषा साखरे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून परवीन खलीफा कुरेशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय इतरही अनेक प्रबळ दावेदारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

अंबडला भाजप स्वबळावर जालना :

भोकरदन येथे काँग्रेसतर्फे प्रियंका प्रतीक देशमुख, जाधव गयाबाई रमेश, भाजपच्या वतीने माळी आशाताई एकनाथ, शर्मा प्रीती रोहित, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून खान सोफिया बेगम शब्बीर, शहा रजियाबी अजहरआली, मिर्झा सम्रीन वेग वसीम वेग, शिवसेना शिंदे गटाकडून शर्मा उज्वला भूषण यांनी उमेवारी अर्ज भरले आहेत. अंबड येथे भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. परतूरला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रियंका शहाजी राक्षे यांच्यासह अकरा प्रभागातील उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news