Dr. Mohan Bhagwat : भारत २०४७ मध्ये जगाला दिशा देणारा देश ठरेल file photo
छत्रपती संभाजीनगर

Dr. Mohan Bhagwat : भारत २०४७ मध्ये जगाला दिशा देणारा देश ठरेल

डॉ. भागवत यांचे पद्म महोत्सवामध्ये प्रतिपादन, प्रत्येकाने नि:स्वार्थ प्रयत्न करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Dr. Mohan Bhagwat: By 2047, India will emerge as a nation that provides direction to the world

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विकसित आणि सशक्त भारत घडवण्यासाठी प्रत्येकाचे निःस्वार्थ योगदान देणे आवश्यक आहे, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. देशहितासाठी काम करणाऱ्या असंख्य लोकांच्या योगदानामुळेच भारत वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे २०४७ मध्ये सशक्त भारत जगाला दिशा देणारा देश ठरेल. भारताला शक्तिशाली व्हायचे आहे ते दुर्बलांना काबूत ठेवण्यासाठी नव्हे, तर त्यांचे रक्षण करण्यासाठी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी (दि. २५) ५ व्या पद्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी केले.

यावेळी निवृत्त सीडीएस जनरल अनिल चौहान, फेस्टिव्हलचे अध्यक्ष मिलिंद केळकर, स्वागताध्यक्ष उन्मेश टाकळकर आणि मंगला केंडे उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून दोन दिवसीय पद्म महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. भागवत म्हणाले, कोणताही चांगला बदल घडवण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो. हा आत्मविश्वास इतरांच्या कार्यातून आणि उदाहरणांतून मिळतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नांनी लगेच परिवर्तन दिसत नसले, तरी सामूहिक प्रयत्नांतून मोठा बदल घडू शकतो. समाजातील दुःख आणि समस्या पाहून केवळ विचार न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

पाहिजे. समाजातील एकता हीच भारताची सर्वांत मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. देशात चुकीचे काम करणाऱ्यांपेक्षा निःस्वार्थ भावनेने चांगले काम करणाऱ्यांची संख्या अनेक पर्टीनी अधिक आहे. त्यामुळे समाजातील सकारात्मक कार्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तरुण, तरुणींसह नागरिकांची उपस्थिती होती.

युवा शक्तीची भुमिका महत्वाची

निवृत्त जनरल अनिल चौहान यांनी भारताची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यात युवाशक्तीची भूमिका महत्त्वात्ची असेल. बाह्य धोक्यांपेक्षा अंतर्गत धोके अधिक गंभीर असून, आभासी माध्यमांतून सामाजिक एकता आणि अखंडता भंग करण्याचे प्रयत्न होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT