Orphaned infant : बसस्थानकात अर्भक आढळल्याचा कॉल; पिशवी उघडताच निघाली 'घूस'

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका पिशवीत बेवारस अर्भक आढळल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला येताच एकच खळबळ उडाली.
Orphaned infant
Orphaned infant : बसस्थानकात अर्भक आढळल्याचा कॉल; पिशवी उघडताच निघाली 'घूस'file photo
Published on: 
Updated on: 

Call received about an infant found at the bus station; upon opening the bag, a 'bandicoot rat' was discovered instead

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका पिशवीत बेवारस अर्भक आढळल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला येताच एकच खळबळ उडाली. क्रांती चौक पोलिसांसह संबंधित यंत्रणेची चांगलीच पळापळ झाली. पोलिसांनी पिशवी उघडून पाहिली असता, आतमध्ये अर्भक नसून कॅरिबॅगमध्ये गुंडाळलेले 'घूस' असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी घडला.

Orphaned infant
Sanjay Raut : ट्रेनिंग सेंटर मंजुरीसाठी ५ कोटींची लाच मागितली

मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ सुरू असताना एका पिशवीत अर्भक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे, बसस्थानकात अर्भक सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नेमके काय घडले हे पाहण्यासाठी प्रवासी व नागरिकांनी मोठी गर्दी केली.

Orphaned infant
Grishneshwar Temple : घृष्णेश्वर मंदिरात आता कमी वेळात होणार दर्शन

पोलिसांनी तत्काळ गर्दी बाजूला सारत त्या संशयास्पद पिशवीचा ताबा घेतला. पिशवी उघडून पाहिली असता, आतमध्ये कॅरिबॅगमध्ये गुंडाळलेली घूस असल्याचे स्पष्ट झाले. सकाळपासून सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आणि स्थानकातील वाहतूक व प्रवाशांची वर्दळ पुन्हा सुरळीत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.