Sambhajinagar News : आघाडीत बिघाडी; भाजप बंडखोराचाही लढण्याचा निर्धार file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : आघाडीत बिघाडी; भाजप बंडखोराचाही लढण्याचा निर्धार

पदवीधर निवडणूक : रा.कॉ. (श.प.)- उबाठा मैत्रीपूर्णच्या तयारीत

पुढारी वृत्तसेवा

Disruption in the alliance; BJP rebel also determined to contest

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पदवीधर निवडणूकीत उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) या दोन्ही पक्षांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा दावा करीत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्याविरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेले भाजपचे एम. के. देशमुख यांनीही रिंगणात कायम राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनधरणीला कितपत यश येणार की हेच चित्र कायम राहणार, हे पाहावे लागणार आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा अगोदरपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. परंतु, शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये फूट पडल्याने व या मतदार संघाचे विद्यमान आमदार चव्हाण हे आघाडीतील राष्ट्रवादीऐवजी महायुतीतील राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने या मतदार संघात उमेदवार दिला आहे.

दिलीप घुगे यांनी उबाठाकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. त्यासोबतच उबाठाने माघार न घेतल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याचे संकेतही राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, दुसरीकडे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली असली तरी भाजपचे एम. के. देशमुख यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे. तसेच माघार घेण्यास देखील त्यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही देशमुख यांची उमेदवारी कायम राहणार की, त्यांची मनधरणी यश येणार यावरच चित्र ठरणार आहे. करण्यात भाजपला निवडणुकीचे पुढील चित्र ठरणार आहे.

मी भाजपसाठीच लढतोय मराठवाडा पदवीधर मतदार संघात मी भाजपसाठीच लढत आहे. विधानसभा निवडणुकीत देखील मी भाजपसाठीच उमेदवारी मागे घेतली होती. अन् आताही भाजप उमेदवाराविरोधात ज्यांनी विधानसभेत निवडणूक लाढविली होती व भाजप उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्या उमेदवाराविरोधातच निवडणूक रिंगणात भाजप म्हणूनच लढणार आहे.
एम.के. देशमुख, बंडखोर उमेदवार
आम्ही निवडणूक लढणारच शिवसेना मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता वरिष्ठच निर्णय घेतील.
अंबादास दानवे, आमदार, शिवसेना उबाठा
नसता आम्ही मैत्रीपूर्ण लढू मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा आमचा पारंपरिक मतदार संघ आहे. त्यामुळे शिवसेनेने (उबाठा) हट्ट सोडून उमेदवारी मागे घ्यावी. वरिष्ठस्तरावर चर्चा सुरू आहे. ऐकले तर ठीक नसता मैत्रीपूर्ण लढू.
राजेश टोपे, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचा
महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यातील घटक पक्षांच्या प्रत्येकाने त्या उमेदवारासाठी काम करणे, हेच वरिष्ठांचे रेष्ठांचे आदेश आहेत. त्यानुसार भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी यासंदर्भातील निर्वाळा दिला आहे.
सतीश चव्हाण, उमेदवार, रा.कॉ. महायुती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT