Digital arrest of retired couple: Rs 78 lakhs looted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा नावाजलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा बनावट नावाचा वापर करत तुमच्यावर एनआयएचा खटला आहे. उद्या अटक होणार, अशी थाप मारत एका निवृत्त दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट करत त्यांच्याकडून ७८ लाख ६० हजार उकळल्याची घटना २ ते ७जुलैदरम्यान समर्थनगरात घडली. या घटनेमुळे ते दाम्पत्य दहशत-ीखाली आहे.
एकनाथ धोंडोपंत जोशी (७७, रा. अक्षय अपार्टमेंट, समर्थनगर) त्यांच्या पत्नी चंद्रकला जोशी यांना २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता एक व्हिडिओ कॉल आला. खाकी गणवेशातील व्यक्तीने स्वतःला संजय पिसे मुंबई पोलिस असल्याचे सांगून तुमच्या पत्नीच्या आधारकार्डच्या मदतीने उघडेल्या कॅनरा बँकेतील खात्यात २ कोटी
घाबरलेल्या जोशी दाम्पत्याने पत्नीच्या एफडीचे पैसे ४ जुलै रोजी पवन मेहुरेच्या खात्यावर २९ लाख, करण कुहेच्या खात्यावर २० लाख, आशिक नागफुसेच्या खात्यावर २० लाख, तर ५ जुलै रोजी सारस्वत बँकेत आपल्या खात्यात उरल-`ली रक्कम जमा केली. ७ जुलै रोजी मास्टर बादल मेश्राम याच्या खात्यावर ९ लाख ६० हजार रुपये असे एकूण ७८ लाख ६० हजार रुपये वरील खात्यांवर वळती केले.
जोशी यांनी ८ जुलै रोजी जावई डॉ. अनुराग पांगरीकर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी लगेच क्रांती चौक पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितली. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निरीक्षक सुनील माने करीत आहेत.