Sambhajinagar Encroachment Campaign : मनपाची महावीर चौक ते मोंढा नाकापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई

जेसीबीने काढल्या संरक्षण भिंती: गट्टू, शोरूमसह २२९ दुकानांचे हटवले अतिक्रमण
Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : मनपाची महावीर चौक ते मोंढा नाकापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाईFile Photo
Published on
Updated on

Municipal Corporation takes action against encroachment from Mahavir Chowk to Mondha Naka

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने महावीर चौक ते सेव्हनहिलदरम्यान जालना रोडवरील ४५ मीटर रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी साडेबाबीस मीटर मोजणी करून गुरुवारी (दि.१०) अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. पथकाने सकाळपासूनच जेसीबीच्या साहाय्याने बाधित मालमत्तांच्या संरक्षण भिंती, गट्टू, शोरूम, दुकानांचे असे २२९ अतिक्रमण काढले. आज मोंढा नाका ते एपीआय कॉर्नरपर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar News : मंत्री शिरसाट यांना आयकरची नोटीस

महापालिका पथकाने गुरुवारी सकाळी बाबा पेट्रोलपंपाजवळ जेसीबीने संरक्षण भिंतीवर हातोडा मारला. यावेळी मालमत्ताधारक प्रिंटर यांनी अधिकाऱ्यांशी बाचाबाची केली. मात्र पथकाने मोजणी करून भिंत तोडली. तसेच या रोडवरील हॉटेल, वाहनांचे शोरूम, खासगी कार्यालये, बँका, रुग्णालय, पेट्रोलपंप, एलआयसी, जिल्हा बँकेच्या मालमत्तांवरील संरक्षण भिंती काढण्यात आल्या.

काही इमारतींना बांधकाम परवानगी असल्याने त्यांना धक्का लावण्यात आला नाही. काहींना वेळ देण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले. दरम्यान अनेक व्यावसायिकांनी पार्किंगसाठी रस्त्याच्या जागेवर गट्टू बसवले होते. हे गट्टू रस्त्यात अडथळा ठरत असल्याने जेसीबीने काढून टाकण्यात आले. यावर काहींनी आक्षेप घेतला, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर क्रांती चौकातील हिमरू शाल आणि पैठणीच्या शोरूमवर पथकाने कारवाई करताच दुकान मालकांनी स्वतःच शोरूम काढून घेतले. न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी व सहकार विभागाच्या मालमत्तांना संरक्षण भिंत काढण्यासाठी वेळ देण्यात आला.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : गोरगरिबांना चल उठ, धनदांडग्यांना सूट, अतिक्रमण हटाव कारवाईत मनपाचा दुजाभाव

समोरच्या भिंती पाडून परतले पथक

महावीर चौकालगतच्या तीन शोरूमला अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र अतिरिक्त आयुक्त यांनी पुन्हा हे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र पथकाने केवळ त्यांच्या भिंती पाडून माघारी फिरल्याचे दिसून आले. मोंढा नाका उड्डाण पुलाजवळील एका धार्मिक स्थळालगतच्या दोन व्यावसायिक धोकादायक इमारती पाडण्यात आल्या. तसेच मोंढा नाका उड्डाणपूल संपल्यानंतर असलेल्या एका इमारतीच्या पायऱ्या काढण्यात आल्या.

नुकसान टाळण्यासाठी स्वतः काढले अतिक्रमण

या मार्गावर अनेक मालमत्ता, बोर्ड रस्त्यात येत असल्याने त्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून काढून घेत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनपाला कारवाई करताना फार पाडापाडी करावी लागली नाही. वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर येणाऱ्या टपऱ्याही मनपाने याकारवाईत जप्त केल्या.

जालना रोडवर वाहतूक ठप्प

अतिक्रमण पथकाकडून जालना रोडवर कारवाई सुरू असल्याने महावीर चौकापासून एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला होता. या मार्गावरील कारवाईसाठी जेसीबीसह अन्य वाहने असल्याने रस्ता अरुंद झाला. त्यामुळे दिवसभर जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहनांना अंतर्गत रस्त्यावरून वळवले. मात्र त्याठिकाणीही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शासकीय कार्यालयांना नोटीस

जालना रोडवर ११ पेक्षा अधिक शासकीय कार्यालये असून, त्यांच्या भिंती नियोजित रस्त्याला बाधित होत आहेत. त्यामुळे मनपाने या कार्यालयांना नोटीस देऊन रस्त्यात बाधित होणारा भाग स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच परवानगी घेत-लेल्या मालमत्ताधारकांनाही मनपाने नोटीस देऊन रस्त्यात येणारा भाग काढून घेण्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news