Differences between office-bearers and the administration at the Municipal Corporation over transfers?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील अधिकारी-कर्मचान्यांच्या बदल्यांवरून पदाधिकारी आणि प्रशासनात बेबनाव असल्याचे चित्र शुक्रवारी (दि.१८) स्पष्टपणे समोर आले. बदल्या करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी भूमिका स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे मांडली. मात्र, हा प्रशासकीय निर्णय असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बदल्यांच्या निर्णयावरून नव्हे, तर पदाधिकाऱ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचे की नाही, यावरून पदाधिकारी-प्रशासनातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी वरिष्ठ लिपिकांना नुकतीच अधीक्षकपदावर पदोन्नती दिली आहे. या प्रक्रियेत काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विभाग बदलण्यात आले. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांवरून गेल्या आठवडाभरापासून महापालिका वर्तुळात धुसफूस सुरू आहे.
दरम्यान, मर्जीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याच विभागात कायम ठेवण्यासाठी काही नगरसेवक, माजी पदाधिकारी, निवृत्त अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या समाजाच्या संघटनांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. यात नगररचना विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला आता अन्य विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
हा पदभार तातडीने बदलावा, यासाठी संबंधितांकडून भेटीगाठी सुरू असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शकवारी सभापती मकरिये यांनी आराक्त येडगे यांची भेट घेतली. बदल्यांची माहिती पदाधिकाऱ्यांना न देता निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी यापुढे बदल्या करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे असे सांगितले त्यामळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेत पदाधिकाऱ्यांचा सहभाग कितपत असावा, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, महापौर राजूरकर यांनी हा प्रशासनाचा विषय असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे महापौरांची भूमिका आयुक्तांच्या प्रशासकीय अधिकारांना पाठिंबा देणारी ठरली. दरम्यान आयुक्त येडगे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याने आपल्याकडे नाराजी अथवा सूचना केलेल्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे सभापतींची विश्वासात घेण्याची मागणी, महापौरांची प्रशासकीय बाब ही भूमिका आणि आयुक्तांचे कोणतीही सूचना आलेली नाही हे स्पष्टीकरण, यामुळे बदल्यांचा मुद्दा महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासनात समन्वय नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
विभाग नियमित बदलले पाहिजेत महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 66 बदल्या हा प्रशासनाचा अधिकार आहे. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विभाग नियमित बदललेच पाहिजेत. कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे, ही प्रशासकीय बाब आहे.- समीर राजूरकर, महापौर
पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे मनपातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या, यासंदर्भात आयुक्तांची शुक्रवारी भेट घेऊन बदल्यांबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही पदाधिकारी असताना माहिती न देता बदल्या करणे योग्य नाही. यापुढे बदल्या करताना आम्हाला विश्वासात घ्यावे, अशी भूमिका आयुक्तांकडे व्यक्त केली आहे.- अनिल मकरिये, स्थायी समिती सभापती