Gold pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Dhanteras Market Turnover : धनत्रयोदशीनिमित्ताने संभाजीनगरच्या सराफा बाजारावर १० कोटींचा धनवर्षाव

भाव वाढीचा फटका असला तरी मुहूर्तावर खरेदीसाठी सकाळपासूनच शहर परिसरातील सोन्या चांदीच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा पहिला दिवस असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे या शुभमुहूर्तावर शुक्रवारी शहरातील सराफा बाजारात आणि विविध सुवर्णपेढ्यांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. ऐन सणाच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला तरी मुहूर्त साधत ग्राहकांनी केलेल्या खरेदीमुळे सराफा बाजारावर सुमारे १० कोटींचा धनवर्षाव झाला.

दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, खरेदीसाठी बाजारपेठ ग्राहकांची झुंबळ उडत आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. त्यातच शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील सराफा बाजारालाही उलाढालीची नवी झळाळी मिळाली.

या मुहूर्तावर पिवर सोन्याचा विडा आणि नवनवीन डिझाइनचे दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी यासह चांदीच्या वस्तू, मुर्ती, देवदेवतांची चित्र असलेल्या सोने-चांदीच्या कॉइनला विशेष मागणी असून काही ग्राहकांनी बुकींग करत मुहर्तावर दागिने घरी नेणे पसंत केल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

शुक्रवारी सराफा बाजारात सोने दर प्रती तोळा १ लाख ४६ हजार रुपये तर चांदीचा दर हा प्रती किलो १ लाख ९२ हजार रुपयांवर पोहचला. भाव वाढीचा फटका असला तरी मुहूर्तावर खरेदीसाठी सकाळपासूनच शहर परिसरातील सोन्या चांदीच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ पाहण्यास मिळाली. लक्ष्मीपुजनासह पाडव्यानिमित्त ग्राहकांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही सराफा व्यापाऱ्याऱ्यांनी व्यक्त केला.

सुमारे दहा कोटीची उलाढाल- दिवाळीचा पहिला दिवस असलेल्या धनत्रयोदशीला शहरातील सराफा बाजारात ग्राहकांच्या गर्दीमुळे चैतन्य पसरले. सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरु असला तरी शुभ मुहूर्तावर ग्राहकांच्या प्रतिसादामुळे ८ ते १० कोटीची उलाढाल झाली. पिवर सोने विडा, क्वॉईनलसह कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती मिळाली.
राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, जिल्हा सराफा असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT