Marathwada Water Shortage : मराठवाड्यात ३५३ गावांना टँकरने पाणीपुरवठा

सर्वाधिक बीड, संभाजीनगरमध्ये, पाणी टंचाईची तीव्रता वाढली
Marathwada Water Shortage
Marathwada Water Shortagepudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मान्सूनमध्ये पावसाखा खंडकाळ अधिक राहिला. त्यामुळे यंदा पावसाळा संपताच विभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या प्रारंभीच विभागात तब्बल ३५३ गावे, २३३ वाड्यांना ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अवघ्या १७ दिवसांत विभागात ११९ टँकर वाढले आहेत.

त्यामुळे विभागात उन्हाळ्याअधीच बिकट स्थिती निर्माण झाली आहे.मराठवाड्यात यंदा एल निनोमुळे पावसाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात कमी राहिले. तब्बल ३८ टक्क्यांची तूट राहिल आहे. उन्हाळ्यापासूनच पाणीटंचाईने डोके वर काढले होते. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्यास टँकरची गरज संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुलैमध्ये काहीसा पाऊस झाल्यानंतर ऑगस्टपासून पावसाने पुन्हा ओढ दिली. त्यामुळे जलस्रोत आटल्याने अनेक गावांना पावसाळ्यानंतरही टँकरवर अवलंबून राहावे लागले आहे.

Marathwada Water Shortage
MPSC Recruitment Update : मोठी बातमी! MPSC गट-क परीक्षेच्या जागांमध्ये विक्रमी वाढ; १६ हजार ७१७ पदांसाठी होणार भरती

सप्टेंबरअखेर १५७ गावे आणि १०३ वाड्यांना २९५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ऑक्टोबरमध्ये ही संख्या झपाट्याने वाढून ५६० वर पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १७२ गावे आणि १८३ वाड्यांना २९४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११९ गावे आणि ३४ वाड्यांसाठी १७९ टँकर धावत आहेत. जालना जिल्ह्यात ४९ गावे, १६ वाड्यांसाठी ६८, तर धाराशिवमध्ये १३ गावांसाठी १९ टँकर सुरू आहेत. विशेष म्हणजे विभागातील ५६० टँकरपैकी केवळ पाच शासकीय असून, उर्वरित खासगी आहेत.

९१७ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यात आतापासूनच पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी म्हणून खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली आणि नांदेड वगळता ६ जिल्ह्यांत ९१७ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यात धाराशिवमध्ये ३४४, लातूर ३०२, बीड १०३, जालना ७५, छत्रपती संभाजीनगर ७४ आणि परभणी १९ विहिरींचा समावेश आहे.

Marathwada Water Shortage
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण; सुनील तटकरे यांच्या वक्तव्याने संभ्रम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.