Deputy Chief Minister is also upset over the encroachment campaign in the city.
छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने राबवलेल्या धडक पाडापाडी मोहिमेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत अतिक्रमण अतिक्रमणधारकांचा देखील विचार करा. ते सुद्धा आपलेच आहेत, ही भावना ठेवा अशा शब्दात गुरुवारी (दि.१४) महापालिकेला कानपिचक्या दिल्या. काढताना शहरातील गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत शहरातील पाच हजार अतिक्रमणे हटवली आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव हा राज्याचा गणेश उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते. या शहरात दर्जेदार कामे झाली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मास्टर प्लान तयार करा, महायुती सरकार कुठेही कमी पडणार नाही. असे सांगून अजित पवार म्हणाले की, तशा स्वरूपात शहरातील अतिक्रमणे काढताना त्या लोकांचा विचार करा, ते सुद्धा आपलेच आहेत, ही भावना ठेवून त्यांच्यासाठी हॉकर्स झोन, मोकळ्या जागांचे नियोजन करा, सविस्तर आराखडा तयार करा, डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद केली जाईल.
त्यापूर्वीच सर्व मंजुरी घेऊन आराखडा सादर करा, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या. तसेच शहरातील अतिक्रमण काढताना नागरिकांचाही विचार करा, पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांचा देखील विचार केला गेला. तशा स्वरूपात शहरातील अतिक्रमणे काढताना त्या लोकांचा विचार करा, ते सुद्धा आपलेच आहेत, ही भावना ठेवून त्यांच्यासाठी हॉकर्स झोन, मोकळ्या जागांचे नियोजन करा, सविस्तर आराखडा तयार करा, डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये निधीची तरतूद केली जाईल. त्यापूर्वीच सर्व मंजुरी घेऊन आराखडा सादर करा, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या.
जायकवाडी धरण शहराच्या उशाशीअसून पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. शहरातील नागरिकांना रोज पाणी मिळाले पाहिजे. तसेच शहरातील रस्त्यामधून जलवाहिनी टाकण्यात आली. वास्तविक पाहता रस्त्यामुळे जलवाहिनीला धोका निर्माण होईल, रस्त्याच्या कडेला जलवाहिनी टाकणे गरजेचे होते. रस्ता रुंदीकरणाची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, असेही पवार यावेळी म्हणाले.
शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले की शहरातील एक कार्यक्रमाला जाताना ३० कोटी रुपये खर्चुन केलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला. मात्र २७ टक्के कमी दराने निविदा गेली असेल तर काय क्वॉलिटी मिळणार असेही अजित पवार म्हणाले.