Crime News : डिलिव्हरी बॉयला मारहाण करत लुटले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : डिलिव्हरी बॉयला मारहाण करत लुटले

दुचाकी, रोख रक्कम अन् हेडफोन पळवले; एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Delivery boy beaten and robbed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तू जेवणाच्या ऑर्डरमध्ये दगडं आणून दिले, असा आरोप करत 'स्विगी'च्या दोन ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयला दांडक्याने मारहाण करत लुटले. ही घटना रविवारी (दि. १६) रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास मिलेनियम पार्क, महेंद्र शोरूमसमोर घडली. मारहाण केल्यानंतर या ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयची दुचाकी, बॅगमधील १९०० रुपये रोख आणि हेडफोन असा १७,०५० रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सोपियान अख्तर खान (२३, रा. बाबर कॉलनी, कटकट गेट) हा स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी (दि. १६) रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास त्याला एका ग्राहकाची जेवणाची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर घेऊन तो कॅनॉट येथून मिलेनियम पार्कमधील ए-५०७ (पाचवा मजला) येथे पोहोचला आणि ग्राहकाला पार्सल दिले.

त्यानंतर सोपियान आपली दुचाकी (एमएच-3 २०-एडब्ल्यू-८३६८) घेऊन परत कॅनॉटच्या दिशेने निघाला होता. तो महेंद्र शोरूमसमोर पोहोचला असता, ज्या ग्राहकाला त्याने पार्सल दिले होते, ते दोन जण पाठीमागून आले. त्यांनी काहीही न बोलता सोपियानच्या पाठीवर दांडक्याने जोरदार वार केला. सोपियान दुचाकीवरून खाली पडला.

हे सगळे आमचेच आहे' म्हणत दुचाकी पळवली

यानंतर त्या दोघांनी सोपियानची दुचाकी, बॅग आणि बॅगेत असलेले १९०० रुपये व १५० रुपयांचे हेडफोन काढून घेतले. सोपियानने माझे ऑर्डरचे पैसे आहेत, असे सांगून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण "तुझे काही नाही, हे सगळे आमचे आहे," असे म्हणत त्यांनी दुचाकी आणि सामानासह तेथून पळ काढला. या मारहाणीनंतर सोपियानने आपल्या मोठ्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जाऊन १८ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT