Sambhajinagar News : मुख्याध्यापकाकडून पालकाला मारहाण

मुलाला शाळेत मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्याचा राग ; जिन्सीतील प्राईम मिनिस्टर इंग्लिश स्कूलमधील प्रकार
sambhajinagar news
Sambhajinagar News : मुख्याध्यापकाकडून पालकाला मारहाणFile Photo
Published on
Updated on

Principal beats up parent

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाळेत आपल्या ५ वर्षीय मुलाला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठी गेलेल्या वडिलांनाच शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या मुलाने लोखंडी खुर्चीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१४) युनूस कॉलनीतील 'प्राईम मिनिस्टर इंग्लिश स्कूल'मध्ये घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar News : सोशल मीडियावर 'भाईगिरी' कराल तर थेट जेलमध्ये जाल

मुख्याध्यापक झिया अहमद शेख आणि त्यांचा मुलगा फरहान झिया शेख (दोघे रा. युनूस कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.फिर्यादी शेख सलमान शेख हिलालउद्दीन (३८, रा. मकसूद कॉलनी, जिन्सी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा ५ वर्षांचा मुलगा सम्रान हा 'प्राईम मिनिस्टर इंग्लिश स्कूल'मध्ये शिकतो. १२ ऑगस्ट रोजी शाळेत असताना त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने त्याला चावा घेतला आणि डोळ्याला पेन्सिल मारून जखमी केले. घरी आल्यावर आईने मुलाच्या अंगावरील जखमा पाहिल्या आणि पतीला कळवले. त्यांनी क्लासटीचर अंजुम मॅडम यांना विचारणा केली असता त्यांनी 'काही झाले नाही' असे उडवाउडवीचे उत्तर दिले.

१३ ऑगस्ट रोजी सलमान शाळेत गेले, तेव्हा मुख्याध्यापक हजर नव्हते आणि 'लाईट आल्यावर सीसीटीव्ही बघून सांगतो' असे सांगण्यात आले. नंतर शाळेतून फोन आला आणि एका मुलाचे नाव सांगून त्याने मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले.

sambhajinagar news
Sillod News : भरधाव कारची ट्रकला धडक, एक ठार, महिला जखमी

तू माझे काही वाकडे करू शकत नाही

१४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सलमान पुन्हा शाळेत गेले आणि त्यांनी मुलाला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. याचा राग आल्याने मुख्याध्यापक झिया शेख आणि मुलगा फरहान यांनी सलमान यांना उद्धटपणे बोलून शिवीगाळ सुरू केली. झिया शेख यांनी सलमान यांचा मोबाईल हिसकावून त्यांना पकडून ठेवले, तर मुलगा फरहान याने तेथे असलेली लोखंडी खुर्ची सलमान यांच्या डाव्या हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. "तू माझे काही वाकडे करू शकत नाही, पोलिसांत गेलास तर तुला जिवे मारून टाकीन," अशी धमकीही त्यांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार विष्णू हगवणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news