गोदावरीत सोन्याचे दागिने शोधण्यासाठी गर्दी file photo
छत्रपती संभाजीनगर

गोदावरीत सोन्याचे दागिने शोधण्यासाठी गर्दी

पैठण येथील दक्षिण काशी गोदावरी नदीपात्रात सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची नाणी शोधण्यासाठी दिवसभर महिला, पुरुषांची गर्दी होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crowds gather in Godavari to search for gold ornaments

पैठण : चंद्रकांत अंबिलवादे

पैठण येथील दक्षिण काशी गोदावरी नदीपात्रात सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची नाणी शोधण्यासाठी दिवसभर महिला, पुरुषांची गर्दी होत आहे. नाथषष्ठीनिमित्त नाथ मंदिर परिसरामागे गोदावरी नदीपात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे. येथे दागिने सापडतील या आशेवर पहाटेपासून दिवस मावळेपर्यंत चाळणी घेऊन त्यांची धडपड सुरू असते.

काही दिवसांवर नाथषष्ठी सोहळा आला आहे. वारकऱ्यांना थांबण्यासाठी त्यांच्या राहुट्यासाठी नदीपात्रात जागा दिली जाते. गोदावरी नदीपात्रातील दशक्रिया विधी घाट ते गणेश घाटापर्यंत जे पाणी आहे, ते झपाट्याने कमी करण्यासाठी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट आहे. येथे दररोज दशक्रिया विधी पार पडतो. विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केले जाते.

यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोने, चांदीच्या वस्तू, चांदीचे नाणेही अनेक जण विसर्जित करतात. नदीतील पाणी ओसरल्यानंतर येथे वाळू व गाळात या सोन्या-चांदीच्या वस्तू सापडतात. सध्या येथील पाणी कमी झाल्याने अनेक पुरुष व महिला आपल्या लेकरांसह हातात चाळण्या, टोपले घेऊन नदीच्या गाळात साने शोधण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नाथमंदिरामागे गोदावरीच्या मोक्ष घाट परिसरात उन्हाची पर्वा न करता सोने मिळेल, या आशेवर त्यांचे काम सुरू असते. काहींना सापडते तर काहींची मेहनत वाया जाते.

सोने-चांदीच्या वाढत्या दराने गर्दीही वाढली

या गोदावरी नदीतील शोधकार्यामध्ये सहभागी असलेल्या पाथर्डी येथील एका तरुणाने सांगितले की, पोटापुरते सोने व चांदी व चिल्लर मिळते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो. शोधकार्य करून पुन्हा आमच्या गावाकडे निघून जातो. सध्या सोने-चांदीला चांगला भाव असल्याने गर्दीही वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT