चांगतपुरी कालव्यात बुडालेल्या तिघांचा शोध लागेना, रेस्क्यू सुरूच

पैठण तालुक्यातील चांगतपुरी परिसरातील जायकवाडीच्या उजव्या कालव्यामध्ये सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार कोसळली होती.
paithan news
चांगतपुरी कालव्यात बुडालेल्या तिघांचा शोध लागेना, रेस्क्यू सुरूचfile photo
Published on
Updated on

Three people who drowned in Changatpuri canal not found, rescue continues

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चांगतपुरी परिसरातील जायकवाडीच्या उजव्या कालव्यामध्ये सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार कोसळली होती. यात कारमधील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला युवक असा तिघांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली.

paithan news
शवविच्छेदनासाठी इमारत नसल्याने मृतदेहांची अवहेलना

मंगळवारी उशिरापर्यंत या तिघांचा शोध लागलेला नव्हता. कारमधील मुखीद अहमद शेख (३५), पत्नी निलोफर मुखिद शेख (३०, रा. कोरडगाव, ता. पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर) तर या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक युवक रावसाहेब खडेकर हे तिघे बेपत्ता आहेत. या घटनेत अल्ताफ ईदाहीत पठाण (रा. हदगाव ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर) हा तात्काळ पाण्याबाहेर आल्यामुळे वाचला होता. त्याला पैठण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कालव्यात बेपत्ता झालेल्या तिन्ही व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोकॉ रावसाहेब आव्हाड यांनी चांगतुपरी गावातील तरुण व पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानासह रेस्क्यू ऑपरेशन मोहीम राबवली. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. या घटनेसंदर्भीत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध लागल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

paithan news
शवविच्छेदनासाठी इमारत नसल्याने मृतदेहांची अवहेलना

चांगतपुरी गाव शोधकार्यात

सोमवारी रात्रीच्या वेळेस कालव्यात कार बुडून दोन जण बेपत्ता झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चांगतपुरी येथील युवक बेपत्ता असल्याने अख्खे चांगतपुरी गाव शोधकार्यात गुंतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news