Crime News: Raids on 'Chakri' gambling dens; 9 persons detained
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. ५) अलर्ट मोडवर कार्यरत राहत शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीत अवैध चक्री जुगार अड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन ठिकाणांहून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, मोबाईल, संगणक संच व इतर साहित्य असा एकूण २ लाख ३४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसी पिंपळगाव शिवारातील दोन ठिकाणी अवैधरीत्या चक्री जुगार सुरू असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ६९ हजार ९६० रुपये रोख रक्कम, ९ मोबाईल फोन, दोन संगणक संच तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस हवालदार संतोष पाटील, पोलिस हवालदार सचिन राठोड आणि पोलिस अंमलदार बलवीरसिंग बहुरे यांनी केली. जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.